लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी; मुंबई पोलिसांची कारवाई,चौघांच्या मुसक्या आवळल्या

lawrence bishnoi news : लॉरेन्स बिश्नोई गँगचे नाव वापरून 30 लाखांची खंडणी मागितल्याची घटना घडली. या प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई केली.
Mumbai news
mumbai crime Saam tv
Published On
Summary

लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव वापरून केली 30 लाख रुपयांची खंडणी मागणी

बोरीवली पोलिसांची मोठी कारवाई.

पोलिसांकडून चार आरोपी अटक

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबई : कुख्यात लॉरेन्स बिश्नोई टोळीचे नाव पुढे करून सराफा व्यापाऱ्याकडून तब्बल 30 लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा बोरीवली पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. आता पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू आहे.

बोरीवलीतील एका सराफा व्यावसायिकाला 18 ते 24 फेब्रुवारी 2026 या कालावधीत व्हॉट्सअ‍ॅप कॉल आणि संदेशांद्वारे धमक्या देण्यात आल्या. खंडणीची रक्कम न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत आरोपींनी भीतीचे वातावरण निर्माण केले होते. तक्रार मिळताच पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला. आरोपींशी संपर्क कायम ठेवत खंडणीची रक्कम सोन्याच्या नाण्यांच्या स्वरूपात देण्याचे नाटक करण्यात आले.

Mumbai news
बजेटआधीच तिजोरीत खडखडाट; फुकट्या योजनांमुळे राज्य अडचणीत, VIDEO

ठरल्याप्रमाणे सोने स्वीकारण्यासाठी आलेल्या रियाजुद्दीन मोहम्मद बशीर (29) याला माहिम पश्चिम परिसरात सापळा रचून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाई करत बांद्रा आणि जोगेश्वरी पश्चिम येथून आणखी तिघांना अटक केली. चौघेही आरोपी झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यातील वासेपुर येथील रहिवासी असल्याचे तपासात उघड झाले आहे.

Mumbai news
मोठी बातमी! BMCच्या ३६ कोटींच्या ठेवी मोडणार, कारणही आलं समोर

आरोपींकडून खंडणीसाठी वापरलेले मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे धमक्या देणाऱ्या मुख्य आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके प्रयत्नशील आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बोरिवली पोलिसांनी ही कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Q

पोलिसांनी या प्रकरणात किती जणांना अटक केली?

A

पोलिसांकडून या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली आहे.

Q

प्रकरणाचा पुढील तपास कोण करत आहे?

A

पोलिसांकडून मुख्य सूत्रधाराचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com