Manasvi Choudhary
संपूर्ण देशभरात होळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे.
यंदा ३ फेब्रुवारी रोजी होळी हा सण साजरा केला जाणार आहे .
हिंदू धर्मात होळी या सणाला विशेष महत्व आहे. होळी सणाच्या दिवशी होलीका दहन केले जाते.
होळी सणापूर्वी घरातील काही वस्तू बाहेर काढणे शुभ मानले जाते. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय मिळवण्याचा संदेश देतो.
शास्त्रानुसार, घरामध्ये साचलेली नकारात्मक ऊर्जा बाहेर काढण्यासाठी आणि सुख-समृद्धी मिळवण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातो.
वास्तुशास्त्रानुसार, तुटलेला आरसा किंवा तडा गेलेली काच घरामध्ये ठेवणे अत्यंत अशुभ असते.
घरातील बंद पडलेले घड्याळ हे प्रगती थांबण्याचे प्रतीक मानले जाते.
स्वयंपाकघरातील तडे गेलेली भांडी किंवा बऱ्याच काळापासून बंद पडलेले रेडिओ, मिक्सर, मोबाईल यांसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू फेकून द्या
जर तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणात एखादे झाड पूर्णपणे सुकले असेल तर ते काढून टाका