ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
होळीचा सण रंगांनी आणि आनंदाने भरलेला असतो. प्रत्येकजण या सणाची आतुरतेने वाट पाहत असतो. होळीच्या दिवशी काही भागात रंग लावले जातात, प्रत्येकजण रंगांत भिजत असतो.
लग्नानंतर, नववधूला होळी साजरी करण्यासाठी तिच्या माहेरी जाण्यास सांगितले जाते. तिला सासरी होळी साजरी करण्याची परवानगी नसते, असं का? काय आहे शास्त्र?
नववधू तिच्या सासरी होळी का साजरी करत नाही? यामागे एक जुनी कहाणी आहे. एक जुनी परंपरा आहे. पण याची काही कारणे आहेत. ते जाणून घेऊ.
पौराणिक कथेनुसार, होलिका प्रल्हादाला मारण्यासाठी दिव्य वस्त्र परिधान करून अग्नीत बसली होती. अग्नी पेटताच प्रल्हादने हरी नावाचा जप सुरू केला. होलिकेचा ते वस्त्र प्रल्हादावर पडला आणि होलिकाचा होरपळून मृत्यू झाला.
होलिकेचं दुसऱ्या दिवशी लग्न होणार होतं. जेव्हा तिचा पती इलोजी आणि तिची सासू लग्नाची वऱ्हाड घेऊन घरी घेऊन आले. तेव्हा सासूने तिच्या सुनेची जळती चिता पाहिली. मुलाचं आयुष्य उद्धवस्त झाल्यानं त्यांना मोठा धक्का बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
तेव्हापासून असे म्हटले जाते की नवीन नववधूने तिच्या सासूसोबत तिच्या सासरच्या घरी जळणारी पहिली होळी पाहू नये.
सुनेची पहिली होळी तिच्या आईवडिलांच्या घरी साजरी करावी. पण जर नववधूनं पहिली होळी तिच्या सासूसोबत साजरी केली तर त्यांच्या नात्यात दुरावा येतो. त्यांच्यात भांडणे होतात.
या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. आम्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही.