Holi 2026 Maharashtra: यंदा होळी नेमकी कधी? पंचांगकर्ते मोहन दातेंनी सांगितला नेमका मुहूर्त आणि दिवस

Holi 2026 Puja Muhurat: होळी 2026 नेमकी कधी साजरी करावी? 2 मार्च रोजी प्रदोषकाळात होलिका दहन आणि 3 मार्च रोजी चंद्रग्रहणाच्या वेधकाळात धुलिवंदन साजरे करता येणार असल्याची माहिती पंचांगकर्त्यांनी दिली आहे.
Holi 2026 Maharashtra
Holi 2026 MaharashtraGOOGLE
Published On

सध्या थंडी कमी होताना आपल्याला जाणवायला लागलय. हे संकेत म्हणजे होळी या सणाचे आगमन असते. होळी हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीच्या आदल्या दिवशी होलीकादहन केले जाते. मग दुसऱ्या दिवशी रंगपंचमी किंवा धुलिवंदन साजरा केले जाते. या दिवशी रंगांची होळी साजरी केली जाते. पुढे पंचांगकर्ते मोहन दाते यांनी होळीच्या दिवसाचे संपूर्ण मुहूर्त आणि तारखा सांगितल्या आहेत.

होळी दरम्यान प्रदोष काळ आणि चंद्रग्रहण असल्याने हा सण नेमका कधी साजरा करायचा या संदर्भात संभ्रण निर्माण झालाय.मात्र चंद्रग्रहण,प्रदोष कालावधी,स्थिती आणि सूर्यास्ताची वेळ पाहता 2 तारखेलाच होलिकादहन आणि 3 तारखेलाच धुलिवंदन साजरा करता येईल.अशी माहिती प्रसिद्ध पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.

Holi 2026 Maharashtra
Acidity VS Pitta: अ‍ॅसिडिटी समजून दुर्लक्ष करताय? पित्ताशयाचा असू शकतो धोका; तज्ज्ञांनी सांगितला नेमका फरक

“या वर्षी 2 मार्च 2026 रोजी सोमवारी भद्रा असताना प्रदोष काळात होलिका दहन करावे.दुसरे दिवशी 3 मार्च 2026 रोजी ग्रस्तोदित चंद्रग्रहण असून मंगळवारी सूर्योदयापासून वेधकाळ सुरु होत आहे,वेधकाळात पौर्णिमेचा कुळधर्म,पूजा-अर्चा,अभिषेक करता येईल.देवाला नैवेद्य दाखविता येईल. वेधामध्ये पूजन निषेध नाही.आपणास भोजन निषेध असल्याने नैवेद्य अगदी थोडा करावा.अशा प्रकारची कर्मे करता येत असल्याने वेधकाळात धूलिवंदन (धुळवड),रंग खेळणे हे देखील करता येईल.“

अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली.दरम्यान ”आपल्या गावाच्या सूर्यास्तापासून १८:४८ पर्यंत ग्रहणाचा पर्वकाल आहे.काही ठिकाणी अगदी थोडावेळ पर्वकाल असल्याने त्यांनी १८:४८ नंतर फक्त मोक्षस्नान करावे.ज्यांना १५-२० मिनिटांपेक्षा अधिक पर्वकाळ मिळत आहे त्यांना सूर्यास्तानंतर स्नान करून थोडावेळ जप करून १८:४८ नंतर मोक्षस्नान करता येईल.“ अशी माहिती पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

Holi 2026 Maharashtra
Fitness Withou Jym: जिमला वेळ नाही? फक्त 20 मिनिटांची ही सवय 30 दिवसांत बदलेल तुमचं शरीर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com