

होळीनिमित्त मध्य रेल्वेने ३० विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला
मुंबई ते वाराणसी, सुलतानपूर, रक्सौल, सहरसा आणि धनबाद मार्गावर रेल्वे धावणार
बुकिंग २० आणि २२ फेब्रुवारीपासून सुरू होईल
प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि गर्दीमुक्त होईल
होळीसाठी गावी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने होळीसाठी ३० अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि सुलतानपूर / वाराणसी दरम्यान ८ रेल्वे आणि लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि रक्सौल / सहरसा / धनबाद दरम्यान २२ विशेष रेल्वे धावणार आहेत. त्यामुळे होळीसाठी गावी जाणाऱ्यांचा प्रवास गर्दीमुक्त आणि आरामदायी होणार आहे. प्रवाशांना तिकीट मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
होळी विशेष ट्रेन क्रमांक 05558, 05586 आणि 03380 च्या वाढीव सेवांसाठी बुकिंग 20 फेब्रुवारीपासून सुरू होईल. वातानुकूलित होळी विशेष ट्रेन क्रमांक 04211 आणि 04225 साठी बुकिंग 22 फेब्रुवारी रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल. सामान्य शुल्कासह अनारक्षित कोचसाठी बुकिंग UTS प्रणालीद्वारे करता येते. प्रवासी तिकिट बुक करण्यासाठी RailOne ॲप देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी तुम्ही www.enquiry.indianrail.gov.in या वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा NTES ॲप डाउनलोड करू शकता.
(अ). लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि सुलतानपूर / वाराणसी दरम्यान ८ होळी विशेष सेवा चालवणार आहे
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - सुलतानपूर - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वातानुकूलित विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 04211 होळी विशेष दिनांक २७.०२.२०२६ आणि ०३.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून १४.३५ वा. सुटेल आणि सुलतानपूर येथे दुसऱ्या दिवशी २३:०० वा. पोहोचेल (२ सेवा).
ट्रेन क्रमांक 04212 होळी विशेष दिनांक २६.०२.२०२६ आणि ०२.०३.२०२६ रोजी सुलतानपूर येथून ०४:०० वा. सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२.२० वा. पोहोचेल. (२ सेवा).
थांबे:- ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खांडवा, इटारसी जंक्शन, राणी कमलापति, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल आणि लखनौ.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - वाराणसी - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई वातानुकूलित विशेष (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 04225 होळी विशेष २६.०२.२०२६ आणि ०२.०३.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून १४.३५ वा. सुटेल आणि वाराणसी येथे तिसऱ्या दिवशी ०२.०५ वा. पोहोचेल (२ सेवा).
ट्रेन क्रमांक 04226 होळी विशेष दिनांक २५.०२.२०२६ आणि ०१.०३.२०२६ रोजी वाराणसी येथून ०१:३५ वा. सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १२.२० वा. पोहोचेल. (२ सेवा).
थांबे:- ठाणे, कल्याण, नाशिक रोड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, खांडवा, इटारसी जंक्शन, रानी कमलापति, बिना, विरांगना लक्ष्मीबाई झाशी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनौ सुलतानपूर आणि जौनपूर सिटी.
संरचना: 04211/ 04212 आणि 04225/ 04226 साठी : १६ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी आणि २ जनरेटर व्हॅन.
(ब) लोकमान्य टिळक टर्मिनस - रक्सौल, लोकमान्य टिळक टर्मिनस - सहरसा आणि लोकमान्य टिळक टर्मिनस - धनबाद या २२ वाढीव सेवांचा होळी विशेष म्हणून चालवणार
लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई- रक्सौल- लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई गाडीला होळी विशेष म्हणून वाढ (८ सेवा)
ट्रेन क्रमांक 05558 लोकमान्य टिळक टर्मिनस - रक्सौल होळी विशेष, जी पूर्वी दर गुरुवारी दिनांक २७.११.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक १२.०३.२०२६ ते ०२.०४.२०२६ पर्यंत दर गुरुवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 05557 रक्सौल - लोकमान्य टिळक टर्मिनस होळी विशेष, जी पूर्वी दर मंगळवारी दिनांक २५.११.२०२५ पर्यंत चालण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक १०.०३.२०२६ पासून ३१.०३.२०२६ दर मंगळवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (४ सेवा)
संरचना: एक प्रथमसह वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई- सहरसा - लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई या गाडीला होळी विशेष म्हणून वाढ (८ सेवा)
ट्रेन क्रमांक 05586 लोकमान्य टिळक टर्मिनस - सहरसा विशेष जी दिनांक ३०.११.२०२५ पर्यंत दर रविवारी चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक ०८.०३.२०२६ ते २९.०३.२०२६ दर रविवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (४ सेवा)
ट्रेन क्रमांक 05585 सहरसा - लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष, दिनांक २८.११.२०२५ पर्यंत दर शुक्रवारी चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक ०६.०३.२०२६ पासून २७.०३.२०२६ दर शुक्रवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (४ सेवा)
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, २ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ द्वितीय आसानासह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - धनबाद - लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई होळी विशेष (६ सेवा) म्हणून चालवणार
ट्रेन क्रमांक 03380 लोकमान्य टिळक टर्मिनस - धनबाद विशेष जी याआधी दिनांक १५.०१.२०२६ पर्यंत दर गुरुवारी चालवण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक १२.०३.२०२६ पासून २६.०३.२०२६ पर्यंत दर गुरुवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (३ सेवा)
ट्रेन क्रमांक 03379 धनबाद- लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष जी याआधी दिनांक १३.०१.२०२६ पर्यंत दर मंगळवारी चालविण्याची सूचना देण्यात आली होती, ती आता दिनांक १०.०३.२०२६ पासून २४.०३.२०२६ पर्यंत दर मंगळवारी चालवण्यासाठी वाढविण्यात आली आहे. (३ सेवा)
संरचना: दोन वातानुकूलित द्वितीय, २ वातानुकूलित तृतीय, ६ वातानुकूलित तृतीय इकॉनॉमी, ६ शयनयान, ४ सामान्य द्वितीय, १ द्वितीय आसनासह गार्ड ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.