

मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज
वंदे भारत ट्रेनला चार अतिरिक्त कोच जोडण्यात आले आहेत
२६ जानेवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत ट्रेन २० डब्यांसह धावणार
यामुळे प्रवाशांची प्रतीक्षा यादी कमी होऊन कन्फर्म तिकीट मिळण्यास मदत होणार
वंदे भारत ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. आता वेटिंग लिस्टची झंझट संपणार आहे. मुंबई-अहमदाबाद रेल्वेमध्ये कन्फर्म सीट मिळविण्यासाठी प्रवाशांना अडथळा येणार नाही. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता भारतीय रेल्वेने वंदे भारत ट्रेनमधील डब्यांच्या संख्येत तात्पुरती वाढ करण्याचा निर्ण घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांची तिकिटाबाबतची चिंता दूर झाली आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२९६१ आणि २२९६२ या दोन वंदे भारत ट्रेन २६ जानेवारी ते ७ मार्च २०२६ पर्यंत २० कोचसह धावतील. दररोज प्रवास करणारे, व्यावसायिक प्रवास करणारे आणि कुटुंबासोबत प्रवास करणारे यांना भेडसावणारी गर्दी, लांब प्रतीक्षा यादी आणि शेवटच्या क्षणी प्रवासाची चिंता कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
मुंबई- सेंट्रल- अहमदाबाद वंदे भारत ट्रेन तात्पुरती २० कोचसह धावणार आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता २६ जानेवारी ते ७ मार्च या कालावधीत वंदे भारत ट्रेनमध्ये चार अतिरिक्त एसी कोच जोडले जातील. यामुळे अधिक प्रवाशांसाठी सीटची क्षमता २७८ ने वाढेल. त्यामुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार नाही. त्याचसोबत त्यांना तिकीटासाठी वाट पाहावी लागणार नाही.
अहमदाबाद-मुंबई मार्गावर वंदे भारत ट्रेनची मागणी अलिकडच्या काळात झपाट्याने वाढली आहे. या ट्रेनचा वेग, कमी वेळात प्रवास आणि आरामदायी आसनांमुळे प्रवाशांची या ट्रेनला पसंती मिळते. प्रवाशांची संख्या देखी वाढत चालली आहे. आठवड्याच्या शेवटी आणि सणांच्या काळात या ट्रेनमधून जास्त प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ट्रेनची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
वंदे भारत ट्रेन मुंबई सेंट्रल ते गुजरातमधील अहमदाबाद जंक्शनदरम्यान धावते. ही ट्रेन ५ तास ४० मिनिटांमध्ये ४९१ किलोमीटर अंतर पार करते. ही ट्रेन वडोदरा, सुरत, वापी आणि बोरिवली या रेल्वे स्थानकावर थांबते. ज्यामुळे ऑफिसला जाणारे, व्यापारी आणि वारंवार शहरांतर्गत प्रवास करणारे लोकांसाठी ती ट्रेक एक प्रमुख पर्याय बनली आहे.
ही ट्रेन रविवार सोडून आठवड्यातील सोमवार ते शनिवार या सहा दिवस धावते. या ट्रेनमध्ये जनरल, तत्काळ, ज्येष्ठ नागरिक आणि महिला कोट्याअंतर्गत तिकिटे बुक करता येतात. ज्यामध्ये एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये बसण्याची सुविधा उपलब्ध आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.