Vande Bharat Express : महाराष्ट्राला आणखी एक वंदे भारत मिळणार? परळीकरांचे थेट रेल्वे विभागाला पत्र

Vande Bharat Express new routes : परळी ते मुंबई किंवा पुणे दरम्यान वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. वंदे भारत सुरू झाल्यास मराठवाड्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
Vande Bharat Express launch date
Vande Bharat Express launch dateSaam TV Marathi News
Published On

योगेश काशिद, बीड प्रतिनिधी

Mumbai to Parli Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसमुळे प्रवास अधिक वेगात आणि आरामदायी झाला आहे. देशात सध्या १५० पेक्षा जास्त वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. राज्यातही वंदे भारत एक्सप्रेसचे मोठं जाळं विस्तारले आहे. पण बीड जिल्ह्यात रेल्वेचा विस्तार तितका नसल्याने अद्याप वंदे भारतचं दर्शन बीडकरांना झालेले नाही. पण परळीमध्ये नियमित रेल्वेसेवा सुरू आहे. त्यात येथे देवस्थानही आहे. त्यामुळे परळीकरांकडून वंदे भारत एक्सप्रेसची मागणी करण्यात आली आहे. मुंबई अथवा पुण्याहून परळीसाठी वंदे भारत एक्सप्रेस सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मराठवाडा जनता विकास परिषदेकडून याबाबतचे पत्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. (New Vande Bharat Express for Marathwada region)

Vande Bharat Express launch date
Gold price today : आजही सोनं महागलं; मुंबई, पुण्यात 22k, 24k ची किंमत किती? वाचा लेटेस्ट दर

मराठवाडा जनता विकास परिषदेने रेल्वे प्रशासनाला पत्र देत परळीची धार्मिक, औद्योगिक आणि व्यापारी महत्त्वाची भूमिका अधोरेखित केली आहे. परळी - मुंबई अथवा पुणे-परळी वंदे भारत रेल्वे सुरू करण्याची मराठवाडा जनता विकास परिषदेने सिकंदराबाद डिव्हिजनच्या सीनियर डीसीएम यांना निवेदन देण्यात आले. सिकंदराबाद डिव्हिजनच्या सीनियर डीसीएम शिफालीकुमार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सिकंदराबाद डिव्हिजनचे मराठवाड्यातील जास्त उत्पन्न देणारे रेल्वे स्टेशन परळी रेल्वे स्टेशन आहे, तसेच या ठिकाणी थर्मल पॉवर स्टेशन आणि बारा ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग ठिकाण असल्याने ही मागणी करण्यात आली आहे .वंदे भारत रेल्वे सेवा सुरू झाल्यास व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होणार आहे.

Vande Bharat Express launch date
Software Engineer Death : बिअर पिण्याची शर्यत जिवावर बेतली, २ सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

बीड जिल्ह्यामध्ये अनेक वर्षापासून रेल्वेसाठी प्रतीक्षा करावी लागली. मात्र अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये रेल्वे धावली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या रेल्वेचे उद्घाटन केलं. स्वर्गीय दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या मतदारसंघातील आणि सध्याचे भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या परळी मतदारसंघांमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून रेल्वेचे स्वप्न परळीकरांचे पूर्ण झालं होतं. आता नव्याने परळी मुंबई वंदे भारत रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी मराठवाडा जनता विकास परिषदेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. थर्मल पावर स्टेशन आणि वाढणारी रहदारी यामुळे मुंबई-परळी वंदे भारतची मागणी करण्यात आली आहे.

Vande Bharat Express launch date
Dog Attack : मोकाट कुत्र्यांच्या झुंडीचा कहर, मुलीला ओढत नेलं अन् अंगाचे तोडले लचके, ४ वर्षांच्या चिमुकलीचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com