Software Engineer Death : बिअर पिण्याची शर्यत जिवावर बेतली, २ सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

Beer drinking challenge death news : आंध्र प्रदेशातील अन्नमय्या जिल्ह्यात बिअर पिण्याच्या शर्यतीत अति प्रमाणात दारू पिल्याने दोन सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला.
beer bottle
beer bottlex
Published On

Beer drinking competition turns fatal in Andhra Pradesh : अति प्रमाणात दारू पिणं किती भयानक असतं, याचं एक धक्कादायक उदाहरण समोर आलेय. आंध्र प्रदेशमध्ये बिअर पिण्याच्या शर्यतीत दोन तरूणांचा मृत्यू झाला आहे. अति बिअर प्यायल्यामुळे २ सॉफ्टवेअर अंजिनिअरचा मृत्यू झाल्याची घटना अन्नमय्या जिल्ह्यात घडली आहे. या प्रकाराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अन्नमय्या जिल्ह्यात संक्रातीवेळी ही घटना घडली. अति प्रमाणात बिअर प्यायल्यामुळे २ सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झालाय. दोन्ही तरुण बिअर पिण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले होते.  मणिकुमार आणि पुष्पराज असे मृत झालेल्या तरूणांची नावे आहेत. दरम्यान, अति प्रमाणात दारू पिणं किती धोकायदायक असतं, याची चर्चा राज्यात सुरू आहे.

beer bottle
Govind Pansare : मोठी बातमी! गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील आरोपीचा मृत्यू

२ इंजिनिअरचा मृत्यू

मकर संक्रांतीवेळी अति प्रमाणात बिअर प्यायल्याने २ सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला. ३५ वर्षाचा मणिकुमार आणि २२ वर्षाचा पुष्पराज अशी मृताची नावे आहेत. दोघेही कंबमवारीपल्ली मंडळातील बंदावड्डीपल्ले गावातील राहणारे आहेत. चेन्नई आणि बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअरमधून ते काम करत होते. संक्राती, पोंगलच्या सणासाठी दोघेही घरी आले होते. पण गावात बिअर पिण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले अन् मृत्यूने गाठले. मणिकुमारच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम १७४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.

beer bottle
पाकिस्तानमध्ये हाहाकार! शॉपिंग मॉलमध्ये अग्नितांडव, २६ जणांचा होरपळून मृत्यू, ८१ बेपत्ता

बियर पिण्याची स्पर्धा

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील काही दिवसांपासून मणकुमार आणि पुष्पराज गावातील उत्सवाच्या कार्यक्रमात मित्रांसोबत दारू पित होते. त्या रात्री दोघांनी अति प्रमाणात दारू प्यायले अन् बेशुद्ध पडले. सहकाऱ्यांनी तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. पण उपचाराधीच दोघांचा मृत्यू झाला. दोघांनी बिअर पिण्याच्या स्पर्धेत भाग घेतला होता आणि जिंकण्याच्या प्रयत्नात प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायले.

beer bottle
Gold price today : आजही सोनं महागलं; मुंबई, पुण्यात 22k, 24k ची किंमत किती? वाचा लेटेस्ट दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com