

रणजीत माजगावकर, कोल्हापूर प्रतिनिधी
Sameer Gaikwad death reason : पुरोगामी नेते, विचारवंत गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित आरोपी समीर गायकवाड याचा मृत्यू झाला आहे. सांगलीतील राहत्या घरी समीर गायकवाड याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक अंदाजानुसार, समीर गायकवाड याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूर येथे झालेल्या गोविंदराव पानसरे यांच्या हत्या प्रकरणी समीर गायकवाड संशयित आरोपी होता. समीर गायकवाड जामीनावर बाहेर होता. सांगलीमध्ये राहत्या घरी त्याचा मृत्यू झाला आहे. १६ सप्टेंबर २०१५ मध्ये समीर गायकवाड याला पानसरे यांच्या हत्या प्रकरणात अटक कऱण्यात आली होती. विशेष तपास पथकाने (SIT) त्यांच्यावर दोषारोपपत्र दाखल केले. कोल्हापूरच्या सत्र न्यायालयाने त्यांना सशर्त जामीन मंजूर केला आहे.
समीर गायकवाड याच्या मोबाईल फोनमधील डेटा आणि आवाजाच्या नमुन्यांची पडताळणी करण्यात आली आहे, असे तपास यंत्रणांनी न्यायालयाला सांगितले आहे. जानेवारी २०२४ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने जामिनाच्या अटींचे उल्लंघन केले नाही असे सांगत, जामीन रद्द करण्याची राज्य सरकारची याचिका फेटाळली होती.
१६ फेब्रुवारी २०१५ रोजी कोल्हापूरमध्ये कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर हल्ला झाला होता. २० फेब्रुवारी २०१५ रोजी पानसरे यांचा उपचारावेळी मृत्यू झाला. या प्रकरणात एकूण १२ आरोपींची नावे समोर आली होती. त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे, तर २ आरोपी फरार आहेत. या हत्येचा संबंध तर्कवादी नरेंद्र दाभोलकर आणि एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्यांशी जोडला जात आहे. या प्रकरणात समीर गायकवाड यालाही अटक कऱण्यात आली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.