... तर मुंबईत ठाकरेंचा महापौर होणार? 'तो' नियम ठरणार महत्त्वाचा, वाचा नेमकं गणित

Mumbai mayor reservation lottery date : मुंबई महापौरपदासाठी २२ जानेवारीला आरक्षण सोडत काढली जाणार असून चक्राकार पद्धतीचा अवलंब झाल्यास हे पद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित होण्याची शक्यता आहे.
उद्धव ठाकरे
Uddhav ThackeraySaam Tv
Published On

महापालिका निवडणुकीनंतर आता राज्याचे लक्ष महापौर सोडतीकडे लागले आहे. महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीचा वापर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी २२ जानेवारीला सोडत निघणार आहे. यामध्ये कोणत्या महानगरपालिकेतील महापौरपद कोणत्या जातीसाठी आरक्षित (Reservation) होणार, हे स्पष्ट होणार आहे.

उद्धव ठाकरे
भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, प्रणिती शिंदेंवर टीका करताना जीभ घसरली, वाचा नेमकं काय झालं?

मुंबईच्या महापौरपदासाठी चक्राकार पद्धतीने सोडत काढली गेल्यास अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाऊ शकतो. जुन्या चक्राकार पद्धतीने यंदा मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमातीच्या (Schedule tribes) वाट्याला येण्याची शक्यता असल्याचे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. कारण 2004 पासून अनुसूचित जमातीचा एकही महापौर मुंबईत झालेला नाही. त्यामुळे आरक्षण सोडतीच्या चक्राकार पद्धतीचा अवलंब झाल्यास यंदा मुंबई महानगरपालिकेत अनुसूचित जातीचा महापौर बसेल. अनुसुचित जमातीचे नगरसेवक फक्त ठाकरेंच्या शिवसेनेत निवडून आले आहेत. त्यामुळे जुन्या चक्राकार पद्धतीने सोडत निघाली तर महायुतीला धक्का बसण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरे
भाजप मंत्र्याचे वादग्रस्त वक्तव्य, प्रणिती शिंदेंवर टीका करताना जीभ घसरली, वाचा नेमकं काय झालं?

तडजोड नाहीच, महापौर भाजपचाच व्हाव... थेट आदेश

मुंबई महापालिकेच्या महापौरपदावर भाजप कोणतीही तडजोड करू नये... असे आदेश दिल्लीतील पक्षनेतृत्वाने राज्यातील नेत्यांना दिले आहेत.. अशी माहिती सुत्रांनी दिलीय.. 89 जागा जिंकत मोठे यश मिळाल्याने महापौरपदावर भाजपचाच हक्क असल्याचे शिंदेसेनेसमोर ठामपणे मांडा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याचं कळतंय... तसेच कार्यकर्त्यांच्या भावनांचा सन्मान राखतानाच मित्रपक्षांशी कटुता टाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत... त्यामुळे आगामी काळात काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे...

उद्धव ठाकरे
BMC Mayor Election: फडणवीसांचा महापौर नको म्हणून शिंदेंचे प्रयत्न - राऊतांचा खळबळजनक दावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com