BMC Mayor Election: फडणवीसांचा महापौर नको म्हणून शिंदेंचे प्रयत्न - राऊतांचा खळबळजनक दावा

Mumbai Mayor election latest news : एकनाथ शिंदेंना दिल्लीतून ‘चावी’ कोण देतोय? 29 नगरसेवक असूनही महापौर पदावर दावा कसा? अमित शहा आणि भाजपच्या भूमिकेवर खासदार संजय राऊत यांनी मोठा सवाल उपस्थित केला आहे.

Sanjay Raut press conference : एकनाथ शिंदे भाजपचे लोहपुरुष असून शिवसेना फोडल्यामुळे अमित शहा त्यांना दिल्लीत खांद्यावर घेऊन फिरतात. कुणीतरी त्यांना दिल्लीतून चावी देत आहे. जर तसे नसते तर 29 नगरसेवकांच्या जोरावर त्यांनी महापौर पदावर दावा सांगितला असता का? भाजप किंवा फडणवीस यांचा महापौर होऊ नये म्हणून दिल्लीतून शिंदेंना चावी देणारा कोण? असा सवाल खासदार संजय राऊत यांनी केला.

शिवसेना विरोधात बसणार का? असे विचारले असता राऊत म्हणाले की, आम्ही अजून काहीच ठरवलेले नाही. आता आम्ही फक्त मजा बघतोय. शिंदे गटाचे नगरसेवक पंचतारांकित हॉटेलमध्ये आहेत. आता भाजपच्या नगरसेवकांनाही कुठेतरी हलवण्यात येत असल्याची माहिती मला मिळतेय. म्हणजे कोण, कुणाला घाबरतंय? असा सवालही राऊत यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com