ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वंदे भारत ट्रेनचे स्लीपर व्हर्जन प्रवाशांसाठी लक्झरी आणि टेक्नोलॉजीचा एक परिपूर्ण संगम घेऊन आली आहे.
तर जाणून घ्या वंदे भारत चेअर कार आणि वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये काय फरक आहे.
वंदे भारत चेअर कारमध्ये एअरकंडीशन चेअर कार (CC आणि EC) सीट्स असतात. तर स्लीपर ट्रेनमध्ये झोपण्यासाठी बर्थची (AC 1st, 2nd आणि 3rd टियर) उपलब्ध आहे.
वंदे भारत चेअर कारची रचना कमी ते मध्यम अंतराच्या प्रवासासाठी (८०० किमी पेक्षा कमी, दिवसाचा प्रवास) केला आहे, तर वंदे भारत स्लीपर ट्रेन लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी (१००० किमी पेक्षा जास्त, रात्रीचा प्रवास) करु शकते.
वंदे भारत चेअर कार गाड्यांमध्ये सामान्यतः १६ किंवा २० डबे असतात, तर वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये १६ डबे असतात (11 AC-3 टायर, 4 AC-2 टायर, 1 AC-1st).
वंदे भारत चेअर कारमध्ये १००० हून अधिक प्रवासी प्रवास करू शकतात, तर वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये अंदाजे ८२३ बर्थ उपलब्ध आहेत.
वंदे भारत चेअर कारमध्ये फिरणाऱ्या सिट्स आहेत, तर वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये आरामदायी गादीचे बर्थ आहेत.
वंदे स्लीपर ट्रेनमध्ये सुधारित सस्पेंशन, कमी आवाज, स्वादिष्ट भोजन आणि प्रीमियम लिनन (बेडशीट, ब्लँकेट) यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत.