Mumbai Thane : मुंबई-ठाणेकरांचा प्रवास आता सुपरफास्ट! ७५ मिनिटांचा प्रवास फक्त २५ मिनिटात; पाहा काय आहे नवा मास्टर प्लॅन

Mumbai Thane new flyover project : मुंबई आणि ठाणेकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्प आणि नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलामुळे मुंबई–ठाणे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून थेट २५ मिनिटांपर्यंत कमी होणार आहे. ४ नवीन इंटरचेंज पुलांमुळे सिग्नल मुक्त प्रवास शक्य होणार असून वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल.
Mumbai Thane Nahur Airoli Flyover
Mumbai Thane Nahur Airoli Flyoversaam tv marathi
Published On

Goregaon Mulund Link Road latest news : मुंबई आणि ठाणे या शहरांमधील प्रवास करायचा, म्हटले की डोळ्यांसमोर वाहतूक कोंडी उभी राहते. वाहतूककोंडीमुळे दीड ते दोन तास प्रवासात जातात. पण आता मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. गोरेगाव-मुलुंड लिंक रोड (GMLR) प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यातील एका महत्त्वाच्या निर्णयामुळे ठाणे आणि मुंबईमधील अंतर अधिकच कमी होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दीड ते २ तासांचा प्रवास फक्त २५ मिनिटांत पूर्ण होऊ शकतो. (Mumbai Thane travel time reduced from 75 minutes to 25 minutes)

मुंबई आणि ठाणे हा प्रवास सुसाट होण्यासाठी मुंबई महापालिकेने ४ नवीन इंटरचेंज पुलांचा (Interchange Bridges) मास्टर प्लॅन तयार केला आहे. नाहूर ते ऐरोली दरम्यान बांधला जाणारा उड्डाणपूल या संपूर्ण प्रकल्पात 'गेम चेंजर' ठरणार आहे. सरकारचा नक्की काय प्लॅन काय आहे, यामुळे तुमचा प्रवास कसा सुखकर होईल? याबाबत सविस्तर जाणून घेऊया....

फक्त २५ मिनिटांत प्रवास

मुंबईतील गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाचा चौथा आणि शेवटचा टप्पा सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेने नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलासाठी ₹१,२९३ कोटींची निविदा जारी केली आहे. १.३३ किलोमीटर लांबीच्या नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलावर ठाणे आणि मुंबईला जोडणारे इंटरचेंज असतील. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई ठाणे यादमरम्यान प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होईल, असा दावा केला जात आहे.

Mumbai Thane Nahur Airoli Flyover
Unseasonal Rain : महाराष्ट्रावर अस्मानी संकट! ऐन हिवाळ्यात पावसाने झोडपले, ठाणे-रायगडमध्ये कोसळला, राज्यात काय स्थिती?

सिग्नल फ्री प्रवास...

नाहूर ते ऐरोली उड्डाणपुलावर ऐरोली उड्डाणपुलावर बांधला जात आहे. या उड्डाणपुलामुळे ईस्टर्न एक्सप्रेस हायवे (EEH) जंक्शनवरील वाहतूक कोंडी कमी होईल. त्याशिवाय या इंटरचेंजमुळे नाहूर, ऐरोली, ठाणे आणि दक्षिण मुंबईला जोडणारे चारही दिशांना सिग्नल-मुक्त कनेक्टिव्हिटी मिळेल.

Mumbai Thane Nahur Airoli Flyover
महाराष्ट्र हादरला! ड्रग्ज प्रकरणात पवारांच्या खासदाराचा विश्वासू कार्यकर्ता, राजकीय वर्तुळात खळबळ

चार इंटरचेंज कुठे असतील?

ऐरोली उड्डाणपुलावर केबल-स्टेड पूल बांधला जाणार आहे. याचं बांधकाम दोन टप्प्यात केले जाईल. पहिल्या टप्प्यात नाहूर ते ऐरोलीला जोडणारा १.३३ किलोमीटर लांबीचा उड्डाणपूलाचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात मुंबईत चार इंटरचेंज असतील. त्यामध्ये ठाणे-नाहूर, ऐरोली-ठाणे, मुंबई-ऐरोली आणि मुंबई-ऐरोली याचा समावेश आहे. १२.२ किलोमीटर लांबीचा गोरेगाव-मुलुंड लिंक रोड गोरेगावमधील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला मुलुंडमधील ईस्टर्न एक्सप्रेस हायवेशी जोडेल. त्याशिवाय दिंडोशी कोर्टाजवळ १.२ किलोमीटर लांबीचा उड्डाणपुल समाविष्ट आहे. जे २०२६ पर्यंत पूर्ण होईल आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालील ट्विन टनेलपर्यंत विस्तारित होईल. यामुळे प्रवासाचा वेळ ७५ मिनिटांवरून २५ मिनिटांपर्यंत कमी होईल.

Mumbai Thane Nahur Airoli Flyover
Ladki Bahin Yojana : जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर लाडकीची संख्या घटणार, महत्त्वाचं कारण आले समोर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com