Mumbai-Pune-Nagpur Special Train : प्रवाशांची वाढती गर्दी आणि मागणी लक्षात घेता मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि सावंतवाडी रोड दरम्यान एकूण २४ विशेष रेल्वे गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये विविध तारखांना या विशेष गाड्या धावणार असून, त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – कोल्हापूर, सीएसएमटी – सावंतवाडी रोड, सीएसएमटी – नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – नागपूर तसेच पुणे – नागपूर या प्रमुख मार्गांवर विशेष रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. गर्दीच्या हंगामात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी या गाड्या अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत.
सीएसएमटी ते कोल्हापूर दरम्यान ६ विशेष रेल्वे सेवा चालवण्यात येणार आहेत. ट्रेन क्रमांक 01029 आणि 01030 या गाड्या १३.०२.२०२६, १८.०२.२०२६ आणि २०.०२.२०२६ या ठरावीक तारखांना धावणार असून, दादर, ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, सातारा, कराड, सांगली आणि मिरज यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहेत. या गाड्यांमध्ये वातानुकूलित, शयनयान तसेच सामान्य डबे उपलब्ध असणार आहेत. ट्रेन क्रमांक 01029 ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी १४.३० वाजता सुटेल आणि श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी ०४.२० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01030 विशेष १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून दुपारी १५.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसर्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.
सीएसएमटी ते सावंतवाडी रोड मार्गावरही ६ विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. कोकण मार्गावरील प्रवाशांसाठी ही सेवा महत्त्वाची ठरणार आहे. दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ आदी स्थानकांवर या गाड्या थांबतील. ट्रेन क्रमांक 01129 विशेष दि. १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून ००.२० वाजता सुटेल आणि सावंतवाडी रोड येथे त्याच दिवशी १२.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01130 विशेष १४.०२.२०२६, १९.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी सावंतवाडी रोड येथून १७.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ०४.०५ वाजता पोहोचेल.
मुंबई (CSMT) आणि नागपूर दरम्यान २ सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. या गाड्या दादर, ठाणे, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, अकोला आणि वर्धा मार्गे धावतील. ट्रेन क्रमांक 02139 सुपरफास्ट विशेष १९.०२.२०२६ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ००.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 02140 सुपरफास्ट विशेष १७.०२.२०२६ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.३० वाजता पोहोचेल. तसेच लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान ४ विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. ट्रेन क्रमांक 01021 सुपरफास्ट विशेष १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १५.४५ वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01022 विशेष दि. १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी नागपूर येथून २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी ११.४५ वाजता पोहोचेल.
याशिवाय पुणे आणि नागपूर दरम्यान एकूण ६ सुपरफास्ट विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. पुणे, दौंड, अहिल्यानगर, कोपरगाव, मनमाड, भुसावळ, अकोला आणि वर्धा या मार्गावरून या गाड्या धावतील. या सेवेमुळे विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. ट्रेन क्रमांक 01467 सुपरफास्ट विशेष १३.०२.२०२६ आणि २०.०२.२०२६ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01468 सुपरफास्ट विशेष दि. १४.०२.२०२६ आणि २१.०२.२०२६ रोजी नागपूर येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री ११.३० वाजता पोहोचेल. पुणे - नागपूर - पुणे सुपरफास्ट विशेष - २ रेल्वे सेवा असतील. ट्रेन क्रमांक 01419 सुपरफास्ट विशेष १८.०२.२०२६ रोजी पुणे येथून दुपारी ३.५० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ०६.३० वाजता पोहोचेल. ट्रेन क्रमांक 01420 सुपरफास्ट विशेष १९.०२.२०२६ रोजी नागपूर येथून सकाळी ०८.०० वाजता सुटेल आणि पुणे येथे त्याच दिवशी रात्री २३.३० वाजता पोहोचेल.
या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण IRCTC च्या www.irctc.co.in या वेबसाइटवर तसेच सर्व पीआरएस आरक्षण केंद्रांवर खुले करण्यात आले आहे. अनारक्षित डब्यांसाठी यूटीएस अॅपद्वारे सामान्य तिकिटे उपलब्ध आहेत. गाड्यांचे सविस्तर वेळापत्रक जाणून घेण्यासाठी प्रवाशांनी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा NTES अॅपचा वापर करावा, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.