Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेता निघाला चोर; बहिणीच्या लग्नासाठी केली चोरी, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Actor Arrested: वेब सीरिजमध्ये काम करणारा अभिनेता टेम्पो चोरीप्रकरणी अटक करण्यात आले आहे. या अटकेनंतर त्याची सध्याची परिस्थिती बिकट करण्यात आला आहे.
actor Brajesh Kumar Ramgopal Rewar
actor Brajesh Kumar Ramgopal Rewar Saam Tv
Published On

Actor Arrested: वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्याला टेम्पो चोरीप्रकरणी अटक करण्यात आल्याने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे. ब्रजेशकुमार रामगोपाल रेवार उर्फ टायगर (वय 28) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, मुंबईच्या आरे पोलिसांनी त्याला गोरेगाव पूर्व परिसरातून अटक केली आहे. आरोपीकडून सुमारे 4.20 लाख रुपये किमतीचा टेम्पो हस्तगत करण्यात आला असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रजेशकुमार रेवारने यापूर्वी काही वेब सीरिजमध्ये काम केले होते. मात्र गेल्या काही काळापासून त्याला काम मिळेनासे झाले. उत्पन्नाचा कोणताही स्थिर स्रोत नसल्याने त्याने उपजीविकेसाठी टेम्पो चालवण्यास सुरुवात केली. दरम्यान, घरातील आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. विशेषतः बहिणीच्या लग्नासाठी मोठ्या रकमेची गरज होती. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आरोपीने चुकीचा मार्ग स्वीकारत टेम्पो चोरीचा निर्णय घेतल्याचे तपासात समोर आले आहे.

actor Brajesh Kumar Ramgopal Rewar
Sugar Avoid Benefits: डाईट करण्यासाठी फक्त आठवडाभर साखर टाळल्याने काय फरक पडतो?

गोरेगाव पूर्व येथून चोरी झालेल्या टेम्पोबाबत तक्रार दाखल होताच आरे पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीचा माग काढला. अखेर आरोपीला अटक करत चोरीचा टेम्पो जप्त करण्यात आला. चौकशीत आरोपीने आपला गुन्हा कबूल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

actor Brajesh Kumar Ramgopal Rewar
Govinda: 'मी माफी मागतो...'; पत्नी सुनीता आहुजाने केलेल्या अफेअरच्या आरोपांवर गोविंदाने मागितली माफी

या प्रकरणाबाबत आरे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “आरोपीकडून गुन्ह्याची कबुली मिळाली असून, या चोरीमागील संपूर्ण नेटवर्कचा तपास केला जात आहे. कायद्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल.”

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com