जर तुम्ही मोठ्या स्क्रीनचा टॅबलेट घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारपेठेत एकाच वेळी दोन नवीन टॅबलेट लॉन्च झाले आहेत. एसर या दिग्गज कंपनीने दोन टॅबलेट लॉन्च केले आहेत. Acer कंपनीकडून टॅबलेट Acer Iconia 8.7 आणि Acer Iconia 10.36 हे टॅबलेट लॉन्च करण्यात आलेत. दोन्ही टॅबलेट ऑउट ऑफ द बॉक्स Android 14 ला पाठिंबा देतात.
तुम्ही OTT स्ट्रीमिंग किंवा दैनंदिन कामासाठी स्वस्त टॅबलेट शोधत असाल तर Acer चे हे नवीन मॉडेल्स तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतात. चला तर आम्ही तुम्हाला Acer Iconia 8.7 आणि Acer Iconia 10.36 च्या फीचर्सविषयी जाणून घेऊ.
Acer Iconia 8.7 हा टॅबलेट ज्या किंमतीमध्ये येतो तो विचारात घेतली तर यात खूप दमदार फीचर्स देण्यात आली आहेत. यामध्ये 8.7 इंचाचा WXGA डिस्प्ले देण्यात आलाय. यामध्ये 1340 x 800 पिक्सेलचे रिझोल्युशन मिळेल. कंपनीने मल्टी टच स्क्रीनचे फीचरदेखील दिले आहे. या टॅबलेटला ४०० निट्सच्या पीक ब्राइटनेसचा सपोर्ट देण्यात आलाय.
यात Acer कडून MediaTek Helio P22T प्रोसेसर प्रदान करण्यात आले आहे. या टॅबलेटमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि फोटोग्राफी या दोन्हीसाठी कॅमेरा देखील देण्यात आलाय. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. याच्या मागील पॅनलमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आलाय. एसरचा या टॅबलेटला ड्युअल स्टीरिओ स्पीकर देण्यात आलेत. यामध्ये कंपनीने 5100mAh बॅटरी दिलीय, जी 10W चार्जिंगला सपोर्ट करते.
एसरने Acer Iconia 10.36 ला 10.36 इंच डिस्प्ले देण्यात आले आहे. याला 2K रिझोल्युशनसह आयपीएस पॅनल डिस्प्ले देण्यात आलाय. या टॅबलेटच्या डिस्प्लेमध्ये 480 nits चा पीक ब्राइटनेस दिलाय. Acer Iconia 10.36 मध्ये, कंपनीने MediaTek Helio G99 octa-core प्रोसेसर दिलाय. हा चिपसेट या टॅबलेटला Acer Iconia 8.7 पेक्षा अधिक शक्तिशाली बनवतो.
Acer Iconia 10.36 मध्ये कंपनीने रिअर पॅनलमध्ये १६ मेगापिक्सेलचा कॅमेरा दिलाय. तर समोरील बाजुस 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आलाय. कंपनीने या टॅबलेटमध्ये क्वाड स्टीरिओ स्पीकर दिलेत. या टॅबलेटला 7400mAh बॅटरी देण्यात आली आहे जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
जर तुम्हाला हे टॅबलेट खरेदी करायचे असतील तर कंपनीने Acer Iconia 8.7 ची किंमत 11,990 रुपये ठेवलीय. तर Acer ने Acer Iconia 10.36 रुपये 14,990 च्या किमतीत लॉन्च करण्यात आले आहे. दोन्ही टॅबलेटमध्ये सोनेरी रंगाचा पर्याय देण्यात आलाय. हे टॅबलेट तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरून तसेच ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वरून खरेदी करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.