8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. आता आठव्या वेतन आयोगाच्या समितीवर नवीन संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

समितीवर नवीन संचालकांची नियुक्ती

कर्मचाऱ्यांना देता येणार सूचना

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आठव्या वेतन आयोगाच्या कामाला वेग आला आहे. आठव्या वेतन आयोगासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. आता आठव्या वेतन आयोगाच्या समितीसाठी नवीन नियुक्ती करण्यात आली आहे. आठव्या वेतन आयोगासाठी नवीन संचालकांची नियुक्ती केली आहे. याचसोबत दोन महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात 'इतका' होणार फिटमेंट फॅक्टर; समोर आली अपडेट

नवीन संचालकांची नियुक्ती

मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने नवीन संचालकांच्या नियुक्तीसाठी मंजुरी दिली आहे. कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाच्या निवेदनानुसार भारतीय रेल्वे लेखा सेवा (IRAS, २००९ बॅच)अधिकारी कृष्णा व्हीआर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आता ते आठव्या वेतन आयोगाच्या समितीत संचालक म्हणून काम पाहतील. अर्थ मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत ही नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे कर्मचाऱ्यांची पगारवाढ आणि पेन्शनवाढीची प्रोसेस अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे.

कर्मचाऱ्यांना सूचना देण्याचे अधिकार

आठव्या वेतन आयोगासाठी नवीन वेबसाइट https://8cpc.gov.in/ सुरु करण्यात आली आहे. यामध्ये आता कर्मचारी, पेन्शनधारक हे पगार, पेन्शनवाढ किंवा फिटमेंट फॅक्टरबाबत सूचना देऊ शकतात. १६ मार्च २०२६ पर्यंत ते सूचना देऊ शकतात.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

शिफारसी लवकरच होणार सादर

अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी संसदेत आठव्या वेतन आयोगाबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, अधिसूचना ३ नोव्हेंबर २०२५ रोजी करण्यात आली आहा. शिफारसी सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आयोगाच्या शिफारसी २०२७ पर्यंत जारी केल्या जाऊ शकतात.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा, खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही होणार परिणाम, कसं? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com