8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. समितीवर आशिष यादव यांची संचालक पदी निवड करण्यात आली आहे.
Published on
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

सरकारी कर्मचारी आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत. आठवा वेतन आयोग कधी लागू होणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. दरम्यान, आठवा वेतन आयोग लागू होण्यास अजून वेळ लागणार आहे. आठव्या वेतन आयोगाची समिती लवकरच शिफारसी सादर करणार आहे. यासाठी १८ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्याआधीच वेतन आयोगाबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत लवकरच निर्णय; आठव्या वेतन आयोगाबाबत नवीन अपडेट

आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट काय? (8th Pay Commission Update)

मोदी सरकारने आठव्या वेतन आयोगाची प्रक्रिया करण्यासाठी प्रशासकीय निर्णय घेतला आहे.कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि पेन्शन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या खर्च विभागाच्या आदेशानुसार, केंद्र सरकारने वेतन आयोगाअंतर्गत संचालक पद भरण्यास मान्यता दिली आहे. आशिष यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे पद आठव्या वेतन आयोगाच्या प्रशासकीय आणि धोरणात्मक तयारीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. आशिष यादव हे तात्काळ कार्यभार स्विकारणार आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! लाखो रुपयांचा एरियर मिळणार; पगार कितीने वाढणार?

सरकारने २०२५ मध्ये आठवा वेतन आयोग स्थापन केला हता. वेतन रचना, आर्थिक परिस्थिती आणि कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेऊ अंतिम अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. आयोगाच्या शिफारसी या १ जानेवारी २०२६ पासून लागू केल्या जाणार आहेत.

पगारवाढ कधीपासून लागू होणार?

आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही जानेवारी २०२६ पासून लागू होणार आहे. ही पगारवाढ प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना कधी मिळणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. शिफारसी सादर केल्यानंतर त्यावर केंद्र सरकार मंजुरी देईल. त्यानंतर पगारवाढ लागू होईल.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी कधी लागू होणार? पगार कधी वाढणार? सरकारने दिली महत्त्वाची बातमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com