8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा, खासगी कर्मचाऱ्यांच्या पगारावरही होणार परिणाम, कसं? वाचा सविस्तर

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारावर होतो. त्यानंतर याचा परिणाम खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरही होणार आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam tv
Published On
Summary

आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार

खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरही होणार परिणाम

सरकारी कर्मचाऱ्यांना २०२६ मध्ये मोठं गिफ्ट मिळणार आहे. कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू झाला आहे. वेतन आयोगाअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. यासाठी कामदेखील सुरु झाले आहे. कर्मचाऱ्यांकडून सूचना मागितल्या जात आहे. आठव्या वेतन आयोगाची समिती तयार केली आहे. पुढच्या वर्ष-दीड वर्षात आठवा वेतन आयोग लागू होऊ शकतो. त्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे. आठव्या वेतन आयोगाचा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनादेखील फायदा होणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! लाखो रुपयांचा एरियर मिळणार; पगार कितीने वाढणार?

आठव्या वेतन आयोगाचा खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना फायदा होणार का?

आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होणार नाहीये. केंद्र सरकारी कर्मचारी, रक्षा कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या पगारात आणि भत्त्यांमध्ये वाढ होणार आहे. दरम्यान, प्रायव्हेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांबाबत कोणतीही शिफारस करण्यात आलेली नाही. आठव्या वेतन आयोगाचा थेट परिणाम जरी प्रायव्हेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर होत नसला तरीही अप्रत्यक्ष परिणाम होतो.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाच्या शिफारसी कधी लागू होणार? पगार कधी वाढणार? सरकारने दिली महत्त्वाची बातमी

खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होणार? (8th Pay Commission Impact on Private Sector Employees)

टॅलेंट कॉम्पिटिशन

सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढल्यानंतर इंजिनियर्स, एमबीए, सीए, आयटी प्राफेशन्स सरकारी नोकरीकडे आकर्षिक होते. त्यांना सरकारी नोकरीकडे जाण्यापासून अडवण्यासाठी प्रायव्हेट कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करावी लागले.

बेंचमार्किंग

अनेक मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगाराला सध्याच्या सातव्या वेतन आयोगाशी तुलना करतात. दरम्यान, आठव्या वेतन आयोगात शिफारसी तयार करतानाच खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा पगार लक्षात घेण्यास सांगितले आहे.

PSU वर परिणाम

केंद्रीय PSU म्हणजे (ONGC, IOC, SAIL, BHEL) यांच्याही पगारात बदल होते. यामुळेही प्रायव्हेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होऊ शकते.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांना गुड न्यूज! आठव्या वेतन आयोगात मिळणार ९ लाखांपर्यंत एरियर; वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com