8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात 'इतका' होणार फिटमेंट फॅक्टर; समोर आली अपडेट

8th Pay Commission Update: आठव्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आठव्या वेतन आयोगातील पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. दरम्यान, फिटमेंट फॅक्टर किती होणार याबाबत अपडेट समोर आली आहे.
8th Pay Commission
8th Pay CommissionSaam Tv
Published On
Summary

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

फिटमेंट फॅक्टर किती होणार?

महागाई भत्त्यावर फिटमेंट फॅक्टर अवलंबून

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग लागू केला जाणार आहे. आठवा वेतन आयोग हा फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असतो. आठव्या वेतन आयोगात पगारवाढ ही फिटमेंट फॅक्टरवर अवलंबून असते. आठवा वेतन आयोग लागू होण्याआधीच महागाई भत्ता वाढणार आहे. दरम्यान आता महागाई भत्ता किती लागू होणार त्यावर फिटमेंट फॅक्टर ठरु शकतो.

8th Pay Commission
DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढणार? वाचा नवीन अपडेट

सरकारने आठव्या वेतन आयोगाची अधिकृत घोषणा केली आहे. त्यानंतर आठव्या वेतन आयोगासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने शिफारसी सादर केल्यानंतर कर्मचाऱ्यांना पगारवाढ मिळणार आहे. दरम्यान, फिटमेंट फॅक्टरबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. महागाई भत्ता संकेत देतोय की, फिटमेंट फॅक्टर १.६० पेक्षा कमी होणार नाहीये. दरम्यान, हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

६० टक्के महागाई भत्ता (DA Hike for Government Employees)

महागाई भत्ता हा CPI-IW वर अवलंबून असतो. डिसेंबर २०२५ नुसार CPI-IW इंडेक्स १४८.२ पॉइंट्स असतो. याच आधारावर जानेवारी २०२६ मध्ये २ टक्के वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाई भत्ता ६०.३४ टक्क्यांवर पोहचेल. यानुसार ६० टक्के रुपये येऊ शकतात. दरम्यान,सध्या तरी महागाई भत्ता वाढलेला नाही. लवकरच घोषणा केली जाईल.

8th Pay Commission
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामाची! आठव्या वेतन आयोगात बेसिक सॅलरी ₹५८,५०० होणार, वाचा सविस्तर

महागाई भत्ता आणि फिटमेंट फॅक्टरचा संबंध

सध्या वेतन आयोगात बेसिक सॅलरीवर महागाई भत्ता लागू केला जातो. ७ व्या वेतन आयोगात महागाई भत्ता ६० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे ज्यांची बेसिक सॅलरी १०० रुपये आहे त्यांनी डीए जोडून १६० रुपये दिले जातात. यामुळेच फिटमेंट फॅक्टर कमीत कमी १.६० होण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

8th Pay Commission
8th Pay Commission: आठवा वेतन आयोग कधीपासून लागू होणार? अर्थसंकल्पात काय घोषणा झाली? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com