Fact Check Saam Tv Youtube
व्हायरल न्यूज

Fact Check : नकली हॉलमार्क लावलेलं सोनं बाजारात? पितळ, तांबं वापरून 22 कॅरेट सोन्याचा हॉलमार्क?

Viral News Fact Check : पितळ, तांब्याचा वापर करून 22 कॅरेट सोनं असल्याचा दावा केला जातोय आणि हेच सोनं ग्राहकांना शुद्ध 22 कॅरेटचं सोनं म्हणून विकलं जातंय. हा व्हिडिओ आता प्रचंड व्हायरल होतोय

Yash Shirke

Fact Check Video: तुम्ही वापरत असलेलं सोनं हे नकली नाही ना...याची पुन्हा खात्री करून घ्या. कारण, हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हालाही तुमच्या दागिन्यांवर विश्वास बसणार नाही. बघा, हा व्हिडिओ.

हा व्हिडिओ आता समोर आल्याने अनेकांना प्रश्न पडलाय...कारण, सोन्यासोबत हे सोनं शुद्ध असल्याचं हॉलमार्क नंबरचं कार्डही दिलं जातं. त्यामुळे यावर अनेकांना विश्वास बसतो. मात्र, याचाच फायदा घेत फसवणूक केली जातेय. या सोन्याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे...त्यामुळे आमच्या टीमने पडताळणी केली. त्यावेळी या व्हिडिओमागचं काय सत्य समोर आलं पाहा.

व्हायरल सत्य

- व्हायरल होत असलेला व्हिडिओ खरा आहे

- दैनिक भास्करने स्टिंग ऑपरेशन करून भांडाफोड केला

- नकली हॉलमार्क लावून सोन्याची विक्री केली जात होती

- अनेक ठिकाणी बाजारात नकली सोनं आढळून आलं

हे नकली असली सोनं कसं ओळखायचं? याची माहिती आपल्याला सांगणं गरजेचं आहे. यामुळे आमचे प्रतिनिधी ज्वेलर्सला भेटले आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. दागिन्यावरील HUID नंबर व्हेरिफाईड करता येतो. ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅन्डर्ड या अॅपवरून नंबर तपासून पाहू शकता. मात्र, यांनी लोकांना कसं फसवलं पाहुयात.

नकली हॉलमार्क लावून कसं फसवलं?

दागिना वजन कॅरेट मूळ किंमत नकली हॉलमार्कनंतर किंमत

चेन 15.5ग्रॅम 5 कॅरेट 29 हजार 1 लाख 25 हजार

---------------

झुमका 1.89 ग्रॅम 5 कॅरेट 2 हजार 17 हजार

-----------------

पॅन्डल .850 ग्रॅम 18 कॅरेट 6 हजार 10 हजार

...म्हणजेच तांब्या पितळेवर हॉलमार्क चढवलेल्या हॉलमार्क सोन्याची किंमत 37 हजार इतकी होती. मात्र, ग्राहकांना ते 1 लाख 52 हजार विकलं गेलं. अशाच प्रकारे राजस्थानमध्ये ही फसवणूक झाल्याचं समोर आलंय. त्यामुळे आमच्या पडताळणी हा दावा सत्य ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

Mangal Budh Yuti 2025: सावधान! मंगळ-बुध ग्रहाची युती,पाच राशींवर येणार संकट

Pune Crime : दारू पिण्यावरुन वाद, थोरल्या भावाने धाकट्या भावाचा केला खून; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT