Maharashtra Politics : तुमच्यासारखे पायाला 56.. विधीमंडळ की बिग बॉस? विधान परिषदेत नळावरची भांडणं कुणी केली? पाहा व्हिडीओ

Maharashtra Legislative Council : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेत नळावरची भांडणं पहायला मिळाली. ही भांडणं नेमकी कुणामध्ये होते? आमदारांनी एकमेकांवर नेमकी कशी चिखलफेक केलीय? याबरोबरच विधीमंडळाचे नियम नेमके काय आहेत? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Maharashtra Legislative Council
Maharashtra Legislative Council Saam Tv
Published On

तुम्हाला बिग बॉस किंवा नळावरच्या भांडण बघितल्यासारखं वाटतंय. पण हे आहे राज्याचं वरिष्ठ सभागृह. विधानपरिषदेतील सत्ताधारी आणि विरोधी आमदारांमधील वादावादी. दिशा सालियन प्रकरणावरुन विधानपरिषदेत ठाकरे सेना आणि भाजपमध्ये जोरदार राडा झाला. अनिल परबांनी संजय राठोड, जयकुमार गोरेंचा उल्लेख केला आणि चित्रा वाघ वाघांचा पाराच चढला.

या वादात अखेर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांनी उडी घेत अनिल परब आणि चित्रा वाघांची कानउघडणी केली. विधानपरिषदेतील वादाचे सभागृहाबाहेरही पडसाद उमटले.. तर पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंनी या कलगीतुऱ्याला थेट बिग बॉसची उपमा दिलीय. याआधीही विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली होती.

Maharashtra Legislative Council
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

खरंतर विधीमंडळात अनेक मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधक भिडत असतात. एखाद्या मुद्द्यावरून वादावादीही होते. मात्र तरीही टीका करताना विधीमंडळाच्या प्रथा परंपरांचं पालन केलं जातं. यामध्ये आमदाराने भाषण करताना कोणते नियम पाळायला हवेत? पाहूयात..

- धोरणात्मक टीका करताना वैयक्तिक हल्ले टाळावेत.

- टीका करताना संसदीय भाषेचा वापर करावा.

- नियम 91 नुसार न्यायालयात प्रलंबित खटल्यांवर भाष्य करु नये.

- सरकारवर टीका करताना विशेषाधिकाराचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी.

Maharashtra Legislative Council
Khelo India 2025 : दिल्लीत महाराष्ट्राचा डंका! खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला ३ गोल्ड, रिक्षा चालकाच्या मुलाची सुवर्ण कामगिरी

विधीमंडळातील आमदारांचं वर्तन राज्यातील जनता पाहात असते. त्यामुळे आमदारांनी राज्याच्या सभागृहात कसं वागायचं..कसं बोलायचं याचं तारतम्य बाळगलं पाहिजे. तरच या विधीमंडळाची प्रतिष्ठा कायम राहील.

Maharashtra Legislative Council
Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीचा चेंडू आता थेट कोर्टात; लहान मुलांचं कारण देत 'याचिका'च दाखल केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com