Aurangzeb Tomb : औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीचा चेंडू आता थेट कोर्टात; लहान मुलांचं कारण देत 'याचिका'च दाखल केली

Aurangzeb Controversy : औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा थेट हायकोर्टात पोहोचला आहे. औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर न्यायालय काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Aurangzeb Tomb Controversy
Aurangzeb Tomb ControversySaam Tv
Published On

औरंगजेबाच्या कबरीवरुन राज्यातील राजकारण तापले आहे. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल सारख्या संघटनांनी कबर उखाडून फेकण्याची मागणी केली होती. प्रकरण वाढल्याने कबरीजवळील परिसराची सुरक्षा वाढवण्यात आली. याच दरम्यान खुलताबाद येथील औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी करत उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी ही याचिका केली आहे. औरंगजेबाची कबर ही राष्ट्रीय स्मारकांच्या व्याख्येमध्ये बसत नाही. या वास्तूमार्फत पुढील पिढीला काहीही शिकण्यासारखं नाही असे तिरोडकर यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे. औरंगजेबाची कबर ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून काढण्याचे निर्देश देणारी मागणी देखील याचिकेमध्ये करण्यात आली आहे.

Aurangzeb Tomb Controversy
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

केंद्रीय पुरातत्व विभागाने त्यांच्या ऐतिहासिक वास्तूंच्या यादीतून औरंगजेबाची कबर वगळावी. त्यानंतर राज्य सरकारने ती कबर कायमची हटवावी. यामुळे भविष्यामध्ये पुन्हा कबरीच्या विषयावरुन जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होणार नाही असे केतन तिरोडकर यांनी म्हटले आहे. छावा चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याबाबत सरकारने विचार करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.

Aurangzeb Tomb Controversy
Khelo India 2025 : दिल्लीत महाराष्ट्राचा डंका! खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला ३ गोल्ड, रिक्षा चालकाच्या मुलाची सुवर्ण कामगिरी

मागील काही दिवसांपासून औरंगजेब आणि त्याची कबर यावरुन वाद सुरु आहे. राज्यभरातून औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी केली जात आहे. १७ मार्च रोजी या मुद्द्यावरुन नागपूरमध्ये दंगल उसळली होती. नागपूर, मराठवाडा यांसह राज्यभरामध्ये तणाव निर्माण झाल्यानंतर औरंगजेबाची कबर झाकून ठेवली गेली.

Aurangzeb Tomb Controversy
Indian Railway : उन्हाळ्यात मुंबई-नांदेड दरम्यान विशेष गाड्यांच्या २४ सेवा चालवणार, मध्य रेल्वेकडून ३५६ उन्हाळी गाड्यांची घोषणा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com