Indian Railway : उन्हाळ्यात मुंबई-नांदेड दरम्यान विशेष गाड्यांच्या २४ सेवा चालवणार, मध्य रेल्वेकडून ३५६ उन्हाळी गाड्यांची घोषणा

Central Railway : मध्य रेल्वेने उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने ३३२ विशेष गाड्यांची घोषणा केली होती. आता रेल्वे प्रशासनाने मुंबई ते नांदेड दरम्यान अतिरिक्त २४ गाड्या चालवल्या जाणार आहेत.
Indian Railway
Indian RailwaySaam Tv
Published On

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी नियमित गाड्यांच्या व्यतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या चालवत आहे. रेल्वे प्रशासनाने आधीच ३३२ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. उन्हाळ्यात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान उन्हाळी विशेष गाड्यांच्या २४ अतिरिक्त सेवा चालवणार आहे. यामुळे उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता ३५६ वर गेली आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस – हुजूर साहेब नांदेड – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष (२४ सेवा)

ट्रेन क्रमांक 01105 ही साप्ताहिक विशेष ट्रेन दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ००.५५ वाजता सुटेल आणि नांदेड येथे त्याच दिवशी १९.०० वाजता पोहोचेल.

ट्रेन क्रमांक 01106 ही साप्ताहिक विशेष ट्रेन दिनांक ०९.०४.२०२५ ते दिनांक २५.०६.२०२५ पर्यंत दर बुधवारी नांदेड येथून २०.०० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १४.४५ वाजता पोहोचेल.

Indian Railway
Indian Railway : रेल्वेचं प्रवाशांना गिफ्ट! उन्हाळी सुट्यांनिमित्त धावणार तब्बल ३३२ विशेष रेल्वेगाड्या, वेळापत्रक पाहा एका क्लिकवर

संरचना : एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्डस ब्रेक व्हॅन, १ जनरेशन व्हॅन आणि १ पॅन्ट्री (बंद स्थितीत)

थांबे : ठाणे, कल्याण, लोणावळा, पुणे, दौंड, कुर्डुवाडी, लातूर, लातूर रोड, परळी, गंगाखेड, परभणी आणि पूर्णा.

Indian Railway
Khelo India 2025 : दिल्लीत महाराष्ट्राचा डंका! खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राला ३ गोल्ड, रिक्षा चालकाच्या मुलाची सुवर्ण कामगिरी

आरक्षण : विशेष ट्रेन क्रमांक 01105 चे बुकिंग विशेष शुल्कासह दिनांक २५.०३.२०२५ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.

अनारक्षित कोचसाठी तिकिटे अतिजलद मेल / एक्सप्रेस ट्रेनसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह यूटीएस द्वारे बुक करता येतील.

तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.

Indian Railway
दगाफटका करून जीवानिशी मारलं अन्...; शिवरायांच्या थोरल्या भावाचा इतिहास तुम्ही वाचलात का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com