
सागर आव्हाड, साम टीव्ही, प्रतिनिधी
नवी दिल्लीमध्ये सध्या खेलो इंडिया स्पर्धा सुरु आहेत. या स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या पॅरा खेळाडूंनी ३ सुवर्ण पदक आणि १ रौप्य पदक अशी विक्रमी कमाई केली आहे. १०० मीटर शर्यतीत अकोल्याच्या चैतन्य पाठकने सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. चैतन्य हा रिक्षा ड्रायव्हरचा मुलगा आहे. त्याने खेलो इंडिया स्पर्धेच्या पात्रता फेरीतही यश संपादन केले आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या पर्वातील खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत जय महाराष्ट्रचा सूर निनादला आहे. अकोला शहरातील रिक्षा चालकाचा मुलगा असणाऱ्या चैतन्य विजय पाठकने १०० मीटर धावणे टी १३ प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला आहे. चैतन्यचे वडील रिक्षा चालक आहेत, तर आई स्वच्छता कर्मचारी आहे.
चैतन्य पाठकसह गोळाफेकीमध्ये कराडच्या साहिल सय्यदने आणि पुण्याच्या सिद्धी क्षीरसागरने सुवर्ण कामगिरी केली आहे. क्रिकेटपटू ते गोळाफेकपटू असा प्रवास करणाऱ्या साहिलने एफ ६४ गोळाफेकीत अव्वल स्थान पटकावले आहे. वैयक्तिक चौथ्या फेरीत ९.५७ मीटरची सर्वात्तम फेकी करुन साहिलने विक्रम केला.
अॅथलेटिक्समध्ये महिला गोळाफेक एफ ५६ प्रकारात सिद्धी क्षीरसागरने सुवर्ण पदक कमावले. तर मीनाक्षी जाधन ही रौप्यपदाची मानकरी ठरली. २०१६ मध्ये आजारामुळे पाठीखालील भाग अधू झाल्यानंतरही हार न मानता सिद्धी क्षीरसागरने वडीलांच्या पाठिंब्याच्या जोरावर आयुष्याशी दोन हात करुन यश मिळवले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.