
आयपीएल २०२५ च्या लिलावात अनसोल्ड राहिलेला भारतीय संघाचा ऑलराउंडर क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर याचे नशीब चमकले आहेत. आयपीएल स्पर्धा सुरू होण्याआधीच त्याच्यासाठी गुड न्यूज आहे. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सकडून आयपीएलच्या १८ व्या पर्वात खेळण्याची संधी त्याला मिळू शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्ट्सनुसार, शार्दुल ठाकूरला जलद गोलंदाज मोहसिन खानची जागा घेणार आहे. खान हा दुखापतीमुळं संघातून बाहेर झाला आहे.
शार्दुल ठाकूर आयपीएलमध्ये लखनऊ संघाकडून खेळणार असल्याचे वृत्त जरी धडकलं असलं तरी, याबाबत लखनऊ संघ किंवा आयपीएल व्यवस्थापनाकडून कोणतीच खात्रीलायक माहिती समोर आली नाही. शार्दुलला या निर्णयाबाबत आधीच संघाकडून कळवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पहिल्या सामन्यात तो संघासोबत जाणार असल्याचं कळतंय.
लखनऊची ताकद वाढणार
लखनऊ सुपर जायंट्स संघातून शार्दुल ठाकूर खेळणार असल्याचं जवळपास निश्चित झालं आहे. शार्दुल संघात येणार असल्यानं गोलंदाजी भक्कम झाली आहे. सध्या लखनऊ संघातील अनेक गोलंदाज जायबंदी आहेत. दुखापतीनं ग्रस्त असलेल्या गोलंदाजांना घेऊन संघ जोखीम पत्करू शकत नाही. आयपीएल स्पर्धा सुरू होतेय. अद्याप संघाकडं तंदुरुस्त गोलंदाजांचा ताफाच नाही. आवेश खान पायाच्या दुखापतीतून सावरला असला तरी, तो अद्याप संघात परतलेला नाही. आकाश दीप आणि मयंक यादव अद्याप सीओईमध्ये आहेत. मयंक हा दुखापतीतून सावरलेलाच नाही. म्हणून मागील वर्षी ऑक्टोबरपासून तो कोणत्याच स्पर्धेत सहभागी झालेला नाही.
संघाचा हुकमी एक्का असलेला मयंक दुखापतीतून पूर्ण सावरलेला नाही. रिहॅब सेंटरमध्येही त्याला अनेक दुखापतींना सामोरे जावे लागत आहे. साइड स्ट्रेन, हॅमस्ट्रिंगचा त्रास त्याला झाला. त्यानंतर पाठीच्या दुखापतीनं तो हैराण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच नेटमध्ये त्याला कमी वेगाने गोलंदाजी करावी लागत आहे. मयंकचा फिटनेस ही एक संघासाठी चिंतेची बाब झाली आहे. मयंकला आयपीएलमध्ये संघाकडून खेळण्याची परवानगी सीओईकडून मिळाली तरी, संपूर्ण स्पर्धेत खेळून फिटनेस टिकवणं हे त्याच्यासाठी आव्हान असणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.