IPL 2025 Live Streaming : आयपीएल पाहण्यासाठी मोजावे लागणार पैसे; कुठे पाहणार पहिला सामना, वाचा

KKR VS RCB Live Streaming : २२ मार्चपासून आयपीएल २०२५ ची सुरुवात होणार आहे. पहिला सामना कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळला जाईल.
IPL Streaming
IPL Streaminggoogle
Published On

KKR VS RCB: २२ मार्चपासून म्हणजेच उद्यापासून आयपीएल (IPL 2025) चा थरार सुरु होणार आहे. पहिलाच सामना गतविजेते कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध गेल्या हंगामात प्लेऑफसाठी क्वालिफाय झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुमध्ये रंगणार आहे. हा सामना कोलकात्यातील ऐतिहासिक स्टेडियम ईडन्स गार्डनवर खेळवला जाणार आहे.

केकेआर विरुद्ध आरसीबीचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे. परंतु ओपनिंग सेरेमनीमुळे सामना सुरु होण्यासाठी विलंब होऊ शकतो. परंतु यावेळी भारतीय फॅन्स आयपीएल मोफत पाहण्याचा आनंद घेऊ शकणार नाही. यावेळी आयपीएल पाहण्यासाठी चाहत्यांना किंमत मोजावी लागणार आहे. गेल्या दोन वर्षापासून फॅन्सने जिओ सिनेमावर आयपीएल मोफत पाहण्याचा पूर्ण आनंद घेतला होता.

IPL Streaming
BCCI: विराटची टीका; आता कौटुंबिक नियमांबाबत मोठी अपडेट समोर, बीसीसीआयचा टीम इंडियाला धक्का!

कोलकाता नाइट राइडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु

आयपीएल २०२५ ची सुरुवात कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्या सामन्याने होणार आहे. हा सामना शनिवार २२ मार्च रोजी कोलकात्यातील ऐतिहासिक स्टेडियम ईडन्स गार्डन्स मैदानावर खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार हा सामना ७.३० वाजता सुरु होईल. दोन्हीही संघाचे कर्णधार अर्धा तास आधी नाणेपेकीसाठी मैदानात उतरतील. या सामन्याआधी आयपीएल ओपनिंग सेरेमनी पार पडेल. या ओपनिंग सेरेमनीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी, गायक अरिजित सिंह, गायिका श्रेया घोषाल परफॉर्म करताना दिसणार आहेत. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. परंतु कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा लाइव्ह सामना टिव्हीवर आणि ऑनलाइन कुठे पाहायचा, जाणून घ्या.

आयपीएल २०२५ लाइव्ह स्ट्रिमिंग (IPL Live Streaming)

भारतीय क्रिकेट फॅन्स कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा आयपीएल २०२५ चा पहिला सामना स्टार स्पोर्टस नेटवर्कवर तसेच स्टार स्पोर्ट्स १८ च्या विविध चॅनवर पाहू शकतात. तसेच हा सामना जिओहॉटस्टारवर लाइव्ह स्ट्रिम केला जाईल. परंतु यावेळी सामन्याची लाइव्ह स्ट्रमिंग पाहता येणार नाही. फॅन्सला ऑनलाईन सामना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहे. सामना पाहण्यासाठी सबस्क्रिब्शन खरेदी करावे लागेल. याशिवाय जिओने १०० रूपयांचा प्लान देखील लाँच केला आहे. यामध्ये जिओ वापरकर्त्यांना ९० दिवसांसाठी जिओहॉटस्टारचे सबस्क्रिबशन मिळेल.

IPL Streaming
Cricketer Death: बॅटिंग करताना अचानक बेशुद्ध पडला; रुग्णालयात पोहोचण्याआधीच क्रिकेटपटूचा मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com