IPL 2025: ओपनिंग सामन्यात KKR-RCB भिडणार! केव्हा, कुठे अन् कधी रंगणार सामना?

IPL 2025 Opening Match Details: आयपीएल २०२५ स्पर्धेतील पहिल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.
kkr vs rcb
kkr vs rcbsaam tv
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना गतवर्षीची विजेता संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.

हा सामना कोलकाताच्या होमग्राऊंडवर म्हणजेच ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी ओपनिंग सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेतील सामने फुकटात पाहता येणार आहेत. पण कुठे पाहता येतील? जाणून घ्या.

kkr vs rcb
IND vs NZ: टीम इंडिया तर मालामाल पण न्यूझीलंडवरही पैशांचा पाऊस; पाहा दोन्ही संघांना किती मिळाली प्राईज मनी

गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धा जिओ सिनेमावर फ्रीमध्ये पाहता येत होती. यावर्षा जिओ सिनेमा आणि हॉटस्टार मर्ज झालं आहे. त्यामुळे फ्रीमध्ये पाहण्यासाठी अट ठेवण्यात आली आहे. जर जिओ युझर्स २९९ किंवा त्यापेक्षा अधिकचा रिचार्ज करत असतील, तर ही स्पर्धा फुकटात पाहता येऊ शकते. ही ऑफर २२ मार्चपासून सुरु होणाऱ्या आयपीएलसाठी मर्यादीत असणार आहे. जर तुम्ही रिचार्च करत नसाल, तर तुम्हाला १४९ रुपयांचं सब्स्क्रिप्शन घ्यावं लागेल.

kkr vs rcb
IPL 2025: लखनऊला मोठा धक्का! स्टार खेळाडू बाहेर? मुंबईच्या या खेळाडूला संघात अचानक एन्ट्री

कुठे लाईव्ह पाहता येतील सामने?

आयपीएल २०२५ स्पर्धेचे लाईव्ह प्रसारण तुम्हाला स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहायला मिळेल. मुख्य बाब म्हणजे, या सामन्यांचे समालोचन तुम्हाला मराठी,हिंदी, तमिळ आणि तेलुगु भाषेतही ऐकायला मिळणार आहे. टीव्हीवरही काही सामने फुकटात पाहण्याची संधी मिळू शकते. हे सामने तुम्ही स्टार उत्सव मुव्ही चॅनेलवर फ्रीमध्ये पाहू शकता. मात्र याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

kkr vs rcb
IPL 2025 : बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटचे नियम बदलले! दिलासा दिला पण कर्णधारांचे टेन्शन पुन्हा वाढवले..

या सामन्याने होणार स्पर्धेची सुरुवात

आयपीएल २०२५ स्पर्धेतील सलामीचा सामना २२ मार्चला होणार आहे. या स्पर्धेची सुरुवात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने होणार आहे. या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी रंगारंग ओपनिंग सेरेमनीचा कार्यक्रम पार पडणार आहे. ज्यात श्रेया घोषाल, करण औजला आणि दिशा पाटनीसारखे स्टार हजेरी लावणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com