IPL 2025: लखनऊला मोठा धक्का! स्टार खेळाडू बाहेर? मुंबईच्या या खेळाडूला संघात अचानक एन्ट्री

Lucknow Super Giants, IPL 2025: आयपीएल २०२५ स्पर्धा सुरु होण्यापूर्वी लखनऊ सुपरजांयट्स संघासाठी टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.
IPL 2025: लखनऊला मोठा धक्का! स्टार खेळाडू बाहेर? मुंबईच्या या खेळाडूला संघात अचानक एन्ट्री
lsgtwitter
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील पहिल्या लढतीत गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ भिडणार आहेत.

तर रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपर जायंट्सचा संघ आपला पहिला सामना २४ मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळणार आहे. या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार, मोहसिन खान दुखापतीमुळे बाहेर होऊ शकतो, तर त्याच्या जागी शार्दुल ठाकूरची संघात एन्ट्री होऊ शकते.

IPL 2025: लखनऊला मोठा धक्का! स्टार खेळाडू बाहेर? मुंबईच्या या खेळाडूला संघात अचानक एन्ट्री
IPL 2025 : बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटचे नियम बदलले! दिलासा दिला पण कर्णधारांचे टेन्शन पुन्हा वाढवले..

लखनऊ सुपर जायंट्स संघातील वेगवान गोलंदाज मोहसिन बऱ्याच दिवसांपासून मैदानापासून दूर आहे. त्यामुळे त्याचं कमबॅक होणं जर कठीण दिसून येत आहे. तो आयपीएळ २०२५ स्पर्धेतून बाहेर पडणार असल्याचंही म्हटलं जात आहे.

दरम्यान टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मोहसिन खान बाहेर पडल्यानंतर त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले जाऊ शकते. आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात शार्दुल ठाकूरनेही आपलं नाव नोंदवलं होतं. मात्र कुठल्याही संघाने त्याच्यावर बोली लावली नव्हती.

IPL 2025: लखनऊला मोठा धक्का! स्टार खेळाडू बाहेर? मुंबईच्या या खेळाडूला संघात अचानक एन्ट्री
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेटस् घेणारे गोलंदाज कोण, माहितीये का?

मुंबईकडून खेळणाऱ्या शार्दुक ठाकूरने रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला होता. यासह त्याच्याकडे आयपीएल स्पर्धेत दिल्ली आणि चेन्नईकडून खेळण्याचा देखील अनुभव आहे. त्याचा आयपीएल स्पर्धेतील रेकॉर्ड पाहिला, तर त्याने या स्पर्धेतील ९५ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना ९४ गडी बाद केले आहेत.

IPL 2025: लखनऊला मोठा धक्का! स्टार खेळाडू बाहेर? मुंबईच्या या खेळाडूला संघात अचानक एन्ट्री
IPL 2025 New Rule: आयपीएलमध्ये 3 नव्या चेंडूंचा वापर! हा नवा नियम तुम्हाला माहितीये का?

तर गेल्या हंगामात गोलंदाजी करताना त्याने ९ सामन्यांमध्ये ५ गडी बाद केले होते. तसेच २०२१ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना दिसून आला होता. या हंगामात खेळताना त्याने १६ सामन्यांमध्ये गोलंदाजी करताना २१ गडी बाद केले होते.

आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी ही लखनऊ सुपर जायंट्सला धक्का बसण्याची पहिलीच वेळ नाही.यापूर्वीही स्टार गोलंदाज दुखापतग्रस्त झाले आहेत. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज मयांक यादव दुखापतग्रस्त आहे. तो केव्हा परतणार, हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही .

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com