KL Rahul, IPL Mega Auction: LSG ने सोडलं, RCB ने नाकारलं; KL Rahulवर या संघाने लावली मोठी बोली

IPL Mega Auctions 2025 Mega Auction Update: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सुरु असलेल्या लिलावात केएल राहुलवर मोठी बोली लावली आहे.
KL Rahul, IPL Mega Auction: LSG ने सोडलं, RCB ने नाकारलं; राहुलवर या संघाने लावली मोठी बोली
kl rahultwitter
Published On

IPL 2025 Mega Auction Update: आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी सुरु असलेल्या लिलावात भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतोय. या लिलावातील सुरुवातीच्या तासभरातच भारतीय खेळाडू मालामाल झाले. या लिलावातील पहिल्या सेटमध्ये रिषभ पंत आणि केएल राहुलवर मोठी बोली लागली.

आधी श्रेयसने सर्वात मोठी बोली लागण्याचा रेकॉर्ड मोडला. त्यानंतर अवघ्या काही मिनिटातच रिषभ पंतवर या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली.

केएल राहुल कोणत्या संघात?

लखनऊ सुपरजायंट्स संघाने केएल राहुलला आपल्या संघाचं कर्णधार बनवलं होतं. मात्र गेल्या हंगामात केएल राहुल आणि संघमालक संजीव गोयंका यांच्याच वाद झाला होता. त्यामुळे त्याने या संघाची साथ सोडून लिलावात येण्याचा निर्णय घेतला होता.

KL Rahul, IPL Mega Auction: LSG ने सोडलं, RCB ने नाकारलं; राहुलवर या संघाने लावली मोठी बोली
IND vs AUS 1st Test Day 3: यशस्वी- विराटनंतर, बुमराह चमकला! टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर

त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ केएल राहुलसाठी बोली लावणार असं म्हटलं जात होतं. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १० कोटींपर्यंत त्याच्यावर बोली लावली .त्यानंतर त्यांनी बोली लावलीच नाही.

त्यानंतर दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी बोली लावली. शेवटी दिल्लीने त्याला १४ कोटी मोजत आपल्या संघात स्थान दिले.

KL Rahul, IPL Mega Auction: LSG ने सोडलं, RCB ने नाकारलं; राहुलवर या संघाने लावली मोठी बोली
IPL 2025 Auction: अर्जुन तेंडुलकरने स्वतःच्या पायावर मारला धोंडा; ऑक्शनच्या काही तास अगोदर हे काय झालं?

केएल राहुलबद्दल बोलायचं झालं, तर त्याने लखनऊला सलग २ वेळेस प्लेऑफपर्यंत पोहोचवलं. गेल्या हंगामातही या संघाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी होती. दरम्यान रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध झालेल्या सामन्यानंतर संजीव गोयंका आणि केएल राहुल यांच्यात चांगलाच शाब्दिक वाद झाला होता.

त्यामुळे केएल राहुल या संघाची साथ सोडणार, अशी चर्चा सुरु होती. त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ७२ सामन्यांमध्ये २२७२ धावा केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com