IPL 2025 : बीसीसीआयने स्लो ओव्हर रेटचे नियम बदलले! दिलासा दिला पण कर्णधारांचे टेन्शन पुन्हा वाढवले..

IPL New Rule : स्लो ओव्हर रेट या नियमामुळे अनेक कर्णधारांवर सामन्यासाठी बंदी ठेवण्यात आली आहे. या नियमामध्ये बीसीसीआयकडून बदल करण्यात आला आहे. नवा नियम नेमकं काय सांगतो? याने कर्णधारांना फायदा होणार का?
IPL 2025
IPL 2025Saam Tv
Published On

IPL 2025 Updates : अवघ्या काही तासांमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएल २०२५ सुरु होण्यापूर्वी बीसीसीआयने नव्या हंगामासाठी खेळातील नियमांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. स्लो ओव्हर रेटवरुन कर्णधारांवर आता बंदी येणार नसल्याचे बीसीसीआयने ठरवले आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात सर्व १० कर्णधारांसह अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकी स्लो ओव्हर रेटमुळे कोणत्याही कर्णधारावर मॅच बॅन येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला. बंदीऐवजी, स्लो ओव्हर रेटसाठी आयसीसीसारखीच एक प्रणाली सुरु केली जाईल. ज्यात तीव्रतेनुसार कर्णधाराला डिमेरिट पॉइंट्स दिले जातील. हे डिमेरिट पॉइंट्स ३ वर्षांच्या कालावधीसाठी राहतील.

IPL 2025
IPL 2025 New Rule: आयपीएलमध्ये 3 नव्या चेंडूंचा वापर! हा नवा नियम तुम्हाला माहितीये का?

कर्णधाराला डिमेरिट पॉइंट्सनुसार शिक्षा दिली जाईल, पण त्याच्यावर सामन्याची बंदी नसेल, अशी माहिती क्रिकबझने दिली आहे. या पॉइंट्स टेबलनुसार, पहिल्या लेव्हलमध्ये दंड म्हणून कर्णधाराकडून २५ ते ७५ टक्के मॅच फी आकारली जाईल. दुसऱ्या लेव्हलमध्ये कर्णधाराला ४ डिमेरिट पॉइंट्स दिले जातील. या ४ पॉइंट्समुळे मॅच रेफरी दंड म्हणून कर्णधाराची १०० टक्के मॅच फी आकारु शकतील किंवा अतिरिक्त डिमेरिट पॉइंट्सच्या स्वरुपामध्ये दंड आकारला जाऊ शकतो.

IPL 2025
IPL New Rule: IPL आधी BCCI चा मोठा निर्णय! या नियमात केला महत्वाचा बदल

बीसीसीआयने इम्पॅक्ट प्लेअर नियमामध्येही बदल करणार असल्याचे म्हटले जात आहे. क्रिकबझनुसार, आयपीएल २०२७ नंतर इम्पॅक्ट प्लेअर नियमाचा आढावा घेण्यात येईल. दोन वर्ष २०२५-२०२६ या दोन्ही हंगामांमध्ये सर्व सामन्यांमध्ये हा इम्पॅक्ट प्लेअर नियम लागू राहील.

IPL 2025
Dhanashree Verma Net Worth: धनश्री वर्माची एकूण संपत्ती किती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com