IPL New Rule: IPL आधी BCCI चा मोठा निर्णय! या नियमात केला महत्वाचा बदल

Saliva Ban Removed In IPL: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी काही नवे नियम लागू केले गेले आहेत. तर काही नियम काढून टाकण्यात आले आहेत.
IPL New Rule: IPL आधी BCCI चा मोठा निर्णय! या नियमात केला महत्वाचा बदल
iplsaam tv
Published On

आयपीएल २०२५ स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी बीसीसीआयने नव्या नियमांची घोषणा केली आहे. स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मुंबईत सर्व १० कर्णधारांची बैठक पार पडली. कोरोनानंतर गोलंदाजांना चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र आता ही बंदी उठवण्यात आली आहे. माध्यमातील वृत्तानुसार बीसीसीआयने कर्णधाराच्या बैठकीत ही बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

IPL New Rule: IPL आधी BCCI चा मोठा निर्णय! या नियमात केला महत्वाचा बदल
IPL 2025: संजूच्या जागी रियानला कर्णधार का बनवलं? ही आहेत ३ प्रमुख कारणं

कोरोनानंतर घेतला होता निर्णय

कोरोनानंतर चेंडूवर लाळ लावण्यावर आयसीसीने बंदी घातली होती. मात्र आयपीएलमध्ये आयसीसीचे नियम लागू केले जात नाहीत. आयपीएलची वेगळी नियमावली आहे. कोरोनापूर्वी चेंडूला लाळ लावणं सामान्य बाब होती. मात्र त्यानंतर कोरोनासारखा आजार पसरण्याची भीती होती. त्यामुळे हा नियम लागू होता.

IPL New Rule: IPL आधी BCCI चा मोठा निर्णय! या नियमात केला महत्वाचा बदल
IPL 2025 New Rule: आयपीएलमध्ये 3 नव्या चेंडूंचा वापर! हा नवा नियम तुम्हाला माहितीये का?

आता असं काहीच नाही. त्यामुळे ही बंदी उठवण्यावर काहीच हरकत नाही. यापूर्वी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने देखील ही बंदी उठवण्याचा आग्रह केला होता. कारण लाळ न लावल्यामुळे गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग करण्यात अडचण येत होती.

IPL New Rule: IPL आधी BCCI चा मोठा निर्णय! या नियमात केला महत्वाचा बदल
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेटस् घेणारे गोलंदाज कोण, माहितीये का?

काय म्हणाला होता शमी?

शमीने लाळ न लावण्याच्या बंदीला कडाडून विरोध केला होता. शमीच्या मते, चेंडूला लाळ न लावल्याने हे फलंदाजांसाठी फायदेशीर ठरु शकतं. याबाबत बोलताना शमी म्हणाला होता की, ' आम्ही रिव्हर्स स्विंग करण्याचा प्रयत्न करतो, मात्र या बंदीमुळे चेंडूवर लाळ लावण्याची अनुमती दिली जात नाही. त्यामुळे आम्ही बंदी उठवण्यात यावी अशी मागणी करतोय. रिव्हर्स स्विंगमुळे सामन्यात आणखी रंगत येऊ शकते.'

आयपीएल २०२५ स्पर्धेला येत्या २२ मार्चपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गतविजेता कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना कोलकाताच्या इडन गार्डन्सवर रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com