IPL Opening Ceremony : ओपनिंग सोहळ्याला बॉलिवूडचा तडका, कोण कोण करणार परफॉर्म?

IPL Opening Ceremony Bollywood celebrity Performances: सध्या जगभरात आयपीएलची क्रेझ पाहायला मिळत आहे. यंदा आयपीएल ओपनिंग सोहळ्याला कोण कोणते बॉलिवूड सेलिब्रिटी परफॉर्म करणार, जाणून घेऊयात.
IPL Opening Ceremony Bollywood celebrity Performances
IPL Opening CeremonySAAM TV
Published On

सध्या जगभरात आयपीएलचा माहोल पाहायला मिळत आहे. चाहते आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत क्रिकेटचे सर्वच दिवाने आहेत. आता सर्वांना आयपीएलच्या ओपनिंगचे वेध लागले आहे. आयपीएलचा ओपनिंग सोहळा 22 मार्चला पार पडणार आहे. या सोहळ्याला बॉलिवूडचे अनेक कलाकार पाहायला मिळणार आहेत. बॉलिवूडचे कोणते सेलिब्रिटी आयपीएलच्या ओपनिंग सेरेमनीची (IPL Opening Ceremony Bollywood celebrity Performances) शोभा वाढवणार जाणून घेऊयात.

आयपीएलचा ओपनिंग सोहळ्याला सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळणार आहे. ओपनिंग सोहळ्याला बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी, गायिका श्रेया घोषाल आणि गायक अरिजित सिंग दिसणार आहेत. आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून ही माहिती दिली आहे. यामुळे चाहते खूप खुश झाले आहेत.

आपल्या हटके स्टाइलने श्रेया घोषाल, करण औजला, दिशा पटानी,अरिजित सिंह, वरुण धवन आणि श्रद्धा कपूर प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. त्याचे खास परफॉर्मन्स येथे पाहायला मिळणार आहेत. तसेच आयपीएलचा ओपनिंग सोहळ्याला अनेक मोठे खेळाडू देखील पाहायला मिळणार आहेत.

मीडिया रिपोर्टनुसार, आयपीएलचा ओपनिंग सोहळ्याला सलमान खानसोबत अनेक मोठे सेलिब्रिटी पाहायला मिळणार आहेत. यात प्रियंका चोप्रा,श्रद्धा कपूर विक्की कौशल आणि संजय दत्त देखील उपस्थित असणार आहे. शाहरुख खान कोलकाता नाईट रायडर्सला पाठिंबा देण्यासाठी येणार आहे. तसेच ओपनिंग सेरेमनीला माधुरी दीक्षित, जान्हवी कपूर,कतरिना कैफ, अनन्या पांडे,करीना कपूर आणि सारा अली खान उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे.

आयपीएल 2025 ची ओपनिंग सेरेमनी कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे. 22 मार्चला 6 वाजता ओपनिंग सेरेमनीला सुरुवात होईल. आयपीएलच्या पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे.

IPL Opening Ceremony Bollywood celebrity Performances
Esha Deol : "आयुष्यात रोमान्स...", लेकीच्या घटस्फोटानंतर हेमा मालिनी यांचा मोलाचा सल्ला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com