
रविवारी ९ मार्च रोजी कोट्यावधी भारतीयांचं स्वप्न रोहित शर्माने पूर्ण केलं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये, टीम इंडियाने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ४ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात विजय मिळवून भारताने चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली. भारतीय संघाने तिसऱ्यांदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवलंय.
यापूर्वी २००२ मध्ये टीम इंडिया श्रीलंकेसोबत संयुक्त विजेता होता, तर त्यानंतर २०१३ मध्ये टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली विजेतेपद जिंकलं होतं. ही ट्रॉफी जिंकण्यासोबतच, टीम इंडिया मालामाल देखील झाली आहे. तर न्यूझीलंड टीमवर देखील उपविजेता म्हणून जणू पैशांचा पाऊस पडला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी सुरू होण्यापूर्वीच आयसीसीने बक्षीस रकमेची घोषणा केली होती. ज्यामध्ये विजेत्या टीमला २.२४ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम मिळणार होती. टीम इंडिया विजेता ठरल्याने भारतीय चलनात ही रक्कम अंदाजे २० कोटी रुपये आहे. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून रोहित सेना मालामाल झालीये.
याशिवाय या स्पर्धेत उपविजेत्या ठरलेल्या न्यूझीलंडला आयसीसीकडून १.१२ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची रक्कम मिळालीये. ही रक्कम म्हणजे अंदाजे १२ कोटी रुपये आहे. उपांत्य फेरीत बाहेर पडलेल्या टीम्सनाही आयसीसीकडून अंदाजे ५ कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. या वर्षीची बक्षीस रक्कम २०१७ मध्ये झालेल्या स्पर्धेपेक्षा सुमारे ५३ टक्के जास्त होती.
टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये त्यांचे सर्व सामने दुबईच्या मैदानावर खेळले. ज्यामध्ये त्यांनी आपलं वर्चस्व दाखवलं. या ठिकाणी खेळल्या गेलेल्या ५ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये भारतीय टीमने लक्ष्याचा पाठलाग केला आणि एक सामना प्रथम फलंदाजी करताना जिंकला. आतापर्यंत भारतीय टीमने दुबईच्या मैदानावर वनडे स्वरूपात एकूण ११ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्यांना १० जिंकण्यात यश आलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.