Rohit Sharma: रोहित शर्मा निवृत्त होणार? रिटायरमेंटच्या प्रश्नावर पाहा हिटमॅनने काय दिलं उत्तर!

Rohit Sharma on Retirement: या विजयानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न होता तो रोहितच्या रिटायरमेंटचा. भारतीय कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीच्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलंय. रोहितने सांगितलं की, जसं चालू आहे तसंच सुरु राहणार आहे.
Rohit Sharma on Retirement
Rohit Sharma on Retirementsaam tv
Published On

अखेर क्रीडा प्रेमींचं स्वप्न टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने पूर्ण केलं. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 4 विकेट्सने पराभव केला. दरम्यान या विजयानंतर चाहत्यांच्या मनात प्रश्न होता तो रोहितच्या रिटायरमेंटचा. भारतीय कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीच्या प्रश्नावर मोठं वक्तव्य केलंय. रोहितने सांगितलं की, जसं चालू आहे तसंच सुरु राहणार आहे.

कर्णधार रोहितनेही तो वनडे फॉर्मेटमधून निवृत्त होणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सामना संपल्यानंतर निवृत्तीच्या प्रश्नावर 37 वर्षीय रोहित म्हणाला, 'भविष्यात याबाबत कोणतीही योजना नाही. जे जसं आहे तसे चालू राहणार आहे. मी या फॉरमॅटमधून (ODI) निवृत्ती घेणार नाही. कोणतीही अफवा पसरवू नका.

Rohit Sharma on Retirement
Champions Trophy: हातात तिंरगा, टीम इंडियाच्या विजयाच्या घोषणा; चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर चाहत्यांचा जल्लोष,VIDEO

अंतिम सामन्यात हिटमॅन रोहितने 41 चेंडूत अर्धशतक ठोकलं. या सामन्यात रोहित 83 चेंडूत 76 रन्स केले. या खेळीत त्याने एकूण 3 षटकार आणि 7 चौकार लगावले.

फायनलनंतर काय म्हणाला रोहित?

फायनलनंतर कर्णधार रोहित म्हणाला, 'ज्यांनी आम्हाला इथे पाठिंबा दिला त्या सर्वांचे मला आभार मानायचे आहेत. हे आमचे होम ग्राउंड नाही, पण त्यांनी ते आमचे होम ग्राउंड बनवलं. आम्हाला खेळताना पाहण्यासाठी आणि जिंकण्यात मदत करण्यासाठी याठिकाणी आलेल्या चाहत्यांची संख्या जास्त होती.

केएल राहुलचं केलं कौतुक

रोहित म्हणाला, 'केएल राहुलचं मन खूप स्ट्रॉंग आहे. आजूबाजूच्या दबावामुळे तो कधीच खचत नाही. त्यामुळे आम्हाला त्याला मिडल ऑर्डरमध्ये ठेवायचं होतं. ज्यावेळी तो फलंदाजी करतो आणि परिस्थितीनुसार योग्य शॉट्स खेळतो तेव्हा तो हार्दिक पांड्यासारख्या फलंदाजांना मोकळेपणाने खेळण्याचे स्वातंत्र्य देतो.

Rohit Sharma on Retirement
Champions Trophy : टीम इंडिया ठरली चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स; PM नरेंद्र मोदी, राहुल गांधींकडून कौतुकाचा वर्षाव, कोण काय म्हणालं?

रोहित म्हणतो, 'आम्ही अशा खेळपट्ट्यांवर खेळतो तेव्हा फलंदाजांनी काहीतरी वेगळं करावं असं आम्हाला वाटते. वरुण चक्रवर्तीने स्पर्धेत आमच्यासाठी सुरुवात केली नाही, पण जेव्हा तो न्यूझीलंडविरुद्ध खेळला आणि 5 विकेट्स घेतल्या, तेव्हा आम्हाला त्याचा फायदा घ्यायचा होता. त्याच्या गोलंदाजीत उत्कृष्ट गुणवत्ता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com