
आयपीएल २०२५ चा पहिला सामना सुरु व्हायला अवघे काही तास उरले आहेत. क्रिकेटचे चाहते आयपीएलची आतुरतेने वाट पाहत आहेत. चाहत्यांसाठी एअरटेलने दोन नवीन प्लान्स लॉन्च केले आहेत. यात JioHotstar सबस्क्रिप्शनचा समावेश देण्यात येणार आहे. या दोन्ही प्लान्सची सुरुवात १०० रुपयांपासून होणार आहे. एअरटेलने हे दोन्ही प्लान्स आयपीएलसाठी तयार करण्यात आले आहेत.
एअरटेलच्या नव्या JioHotstar प्लान्सची किंमत १०० रुपये आणि १९५ रुपये इतकी आहे. हे दोन्ही डेटा व्हाउचर प्लान्स आहेत. ज्या यूजर्सकडे आधीपासूनच अॅक्टिव्ह प्रीपेड प्लान असेल, तेच यूजर्स या डेटा व्हाउचरसह रिचार्ज करु शकतील. या दोन्ही प्लान्सच्या फायद्यांबद्दल माहिती देणार आहोत.
एअरटेल १०० रुपयांचा प्लान
एअरटेलच्या १०० रुपयांच्या डेटा प्लानची वैधता ही ३० दिवस इतकी असेल. या प्लानमध्ये यूजर्संना JioHotstar चे मोबाईल सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय त्यांना ५ जीबी डेटाचा फायदा देखील घेता येईल.
एअरटेल १९५ रुपयांचा प्लान
एअरटेलच्या १०० रुपयांच्या डेटा प्लानची वैधता ही ९० दिवस इतकी असेल. ९० दिवसांची वॅलिडिटी JioHotstar च्या मोबाईल सबस्क्रिप्शनवर देखील लागू असेल. या वाऊचरसह यूजर्सना १५ जीबी डेटा मिळेल.
या दोन प्लान्स व्यतिरिक्त JioHotstar शी जोडलेले इतर एअरटेलचे प्रीपेड प्लान देखील उपलब्ध आहेत. या प्लान्सची किंमत ३,९९९ रुपये, ५४९ रुपये, १०२९ रुपये आणि ३९८ रुपये अशी आहे. यूजर्स या प्लान्सचा वापर करुन आयपीएलसह JioHotstar वरील अन्य कार्यक्रम सुद्धा पाहू शकतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.