Yuzvendra Chahal t-shirt: घटस्फोटानंतर न बोलताच चहलचा धनश्रीला सनसणीत टोला; टी-शर्टवर लिहिला खास संदेश,अर्थ जाणून व्हाल थक्क

Yuzvendra Chahal t-shirt Meaning: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा अधिकृत घटस्फोट झाला आहे. पण, कोर्टात जाताना युझवेंद्रच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
Yuzvendra Chahal t-shirt Meaning
Yuzvendra Chahal t-shirt MeaningSaam Tv
Published On

Yuzvendra Chahal t-shirt: क्रिकेटपटू युझवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा गुरुवारी त्यांच्या घटस्फोटाच्या सुनावणीसाठी मुंबई न्यायालयात पोहोचले. या विभक्त जोडप्याच्या उपस्थितीने मीडियामध्ये खळबळ उडाली असताना, युझवेंद्रच्या टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

युझवेंद्र चहलचा 'बी युअर ओन शुगर डॅडी' टी-शर्ट

युझवेंद्र चहल आणि धनश्री वेगवेगळे आले. यावेळी धनश्रीने पांढऱ्या रंगाचे टी-शर्ट आणि निळ्या जीन्स परिधान केले होते, तर युझवेंद्रने काळ्या रंगाचे टी-शर्ट आणि डेनिम पँट घातली होती. परंतू त्याच्य टी-शर्टने सर्वांचे लक्ष वेधले कारण त्यावर "बी युअर ओन शुगर डॅडी. असे लिहिले होते.

Yuzvendra Chahal t-shirt Meaning
Kon Honar Maharashtracha Ladka Kirtankar: ‘कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार’! ह.भ.प.राधाताई सानप आणि ह.भ.प.जगन्नाथ महाराज पाटील परीक्षकांच्या भूमिकेत

त्याच्या टी-शर्टमुळे सोशल मीडिया नेटकऱ्यांना असे वाटू लागले आहे की ही धनश्रीवर अप्रत्यक्ष टीका आहे. घटस्फोट घेताना कुटुंब न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार धनश्रीला युझवेंद्रकडून ४.७५ कोटी रुपये पोटगी म्हणून मिळणार आहे. युजवेंद्र चहलने २ कोटी, ३७ लाख आणि ५५ हजार दिली असून राहीलेली रक्कम घटस्फोट झाल्यानंतर देणार आहे.

Yuzvendra Chahal t-shirt Meaning
Sikandar Box Office Prediction: सलमान खान ब्लॉकबस्टर ओपनिंगसाठी सज्ज; 'सिकंदर' करणार का रेकॉर्ड ब्रेक कमाई?

युजवेंद्रच्या 'शुगर डॅडी' टी-शर्टवर इंटरनेटवर प्रतिक्रिया

युजवेंद्रच्या टी-शर्टवर प्रतिक्रिया देताना, एका नेटकऱ्याने हसणाऱ्या इमोजीसह कमेंटमध्ये लिहिले, "छान टी-शर्ट," तर दुसऱ्याने लिहिले, "टी-शर्ट जाणूनबुजून घातला होता" कोणीतरी अशीही टिप्पणी केली, "चांगला खेळलेला भाऊ." चहलने घातलेल्या या टी-शर्टचा तुमच्या गरजा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याऐवजी स्वतःवर अवलंबून राहणे असा अर्थ होत असल्यामुळे त्याच्या टी-शर्टने सगळ्यांचे लक्ष वेधले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com