Shruti Vilas Kadam
क्रिकेटर युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा यांचा लवकरच डिव्होर्स होणार आहे.
घटस्फोटासाठी युजवेंद्र चहलला त्याची पत्नी धनश्री वर्माला पोटगी म्हणून ४.७५ कोटी रुपये द्यावे लागणार आहेत.
यापैकी युजवेंद्र चहलने धनश्रीला २.३७ कोटी रुपयेही दिले आहेत. तर,उर्वरित रक्कम घटस्फोटानंतर द्यावी लागेल.
पण मधल्या काळात चहलने धनश्रीला ६० कोटी रुपयांची पोटगी दिल्याची अफवा पसरली होती.
युजवेंद्र चहल बीसीसीआयच्या सामन्याच्या फीमधून कमाई करतो. याशिवाय तो आयपीएलमधूनही कोट्यवधी रुपये कमावतो.
युजवेंद्र चहल सोशल मीडियाद्वारेही कमाई करतो. तसेच चहल ब्रँड जाहिरातींमधूनही पैसे कमवतो.
युजवेंद्र चहल हा एका आलिशान घराचा मालक देखील आहे. त्याच्याकडे पोर्श मर्सिडीज बेंझ सी-क्लास आहे. रोल्स रॉयस आणि लॅम्बोर्गिनी सारख्या महागड्या गाड्या देखील आहेत.
एका अहवालानुसार, युजवेंद्र चहलची एकूण संपत्ती ४५ कोटी रुपये आहे.