mi vs dc saam tv news
Sports

WPL 2024 Live Streaming: केव्हा अन् कुठे रंगणार WPL चे सामने? इथे पाहू शकतात फुकटातच; पाहा A to Z माहिती

WPL 2024 Live Streaming And Match Details: वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी सर्व ५ संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने होणार आहे.

Ankush Dhavre

WPL 2024 Live Streaming Details:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचा बिगुल वाजला आहे. या स्पर्धेसाठी सर्व ५ संघ सज्ज झाले आहेत. या स्पर्धेची सुरुवात मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. या दोन्ही संघांनी गेल्या हंगामात स्पर्धेची फायनल गाठली होती. आता दोघेही स्पर्धेचा सलामीचा सामना खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. या स्पर्धेतील सर्व सामने भारतातील २ शहरांमध्ये रंगणार आहे. दरम्यान जाणून घ्या स्पर्धेबद्दल सर्वकाही.

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेला केव्हा होणार सुरुवात?

या स्पर्धेला २३ फेब्रुवारीपासून प्रारंभ होणार आहे.

किती वाजता सुरु होणार सामना?

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरु होणार आहेत. तर नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होणार आहे.

कोणत्या २ संघांमध्ये रंगणार वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना?

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. (Cricket news in marathi)

कुठे रंगणार स्पर्धेतील पहिला सामना?

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहे.

कुठे पाहता येईल लाईव्ह स्ट्रिमिंग ?

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील सामने टीव्हीवर स्पोर्ट्स १८ सह कलर्स सिनेप्लेक्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

इथे पाहू शकता लाईव्ह

वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना फ्रीमध्ये देखील पाहता येणार आहे. हे सामने तुम्ही जियो सिनेमा अॅप आणि वेबसाईटवर फ्रीमध्ये पाहू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Marathi Bhasha: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा जल्लोष मुंबई लोकलमध्येही|VIDEO

Marathi bhasha Vijay Live Updates : राज ठाकरे-उद्धव ठाकरे मेळाव्यासाठी रवाना, थोड्याच वेळात तोफ धडाडणार

Raj-Uddhav Thackeray: राज-उद्धव ठाकरे याआधी एकाच मंचावर कधी आणि कुठे आले होते?

Sushil Kedia: राज ठाकरेंना धमकी देणं पडलं महागात, उद्योजक सुशील केडियांचं ऑफिस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Metro In Dino : 'मेट्रो इन दिनों'ची बॉक्स ऑफिसवर संथ सुरुवात, पहिल्या दिवशी कमावले फक्त 'इतके' कोटी

SCROLL FOR NEXT