IND vs ENG 4th Test, Team India Squad: चौथ्या कसोटीतून जसप्रीत बुमराहसह प्रमुख फलंदाज बाहेर! असा आहे संपूर्ण संघ

Team India Squad For 4th Test: मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.
team india squad
team india squadsaam tv news
Published On

IND vs ENG 4th Test, Team India Squad:

भारत आणि इंग्लंड (India vs England) या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ४३४ धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारतीय संघाने २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये रंगणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात काही मोठे बदल करण्यात आले आहेत. संघातील प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. यासह केएल राहुल देखील चौथ्या कसोटीत खेळताना दिसून येणार नाही. जसप्रीत बुमराह बाहेर झाल्यानंतर मुकेश कुमारला संघात स्थान देण्यात आले आहे. यावरून स्पष्ट आहे की, चौथ्या कसोटीत प्लेइंग ११ मध्ये बदल पाहायला मिळू शकतात. (Team India Squad)

team india squad
IND vs ENG 4th Test: रांची कसोटीतून रजत पाटीदारची होणार सुट्टी! हा प्रमुख खेळाडू करतोय कमबॅक

बीसीसीआयने मंगळवारी (२० फेब्रुवारी) प्रेस रिलीज प्रसिद्ध करत म्हटले की, वर्कलोड मॅनेज करण्यासाठी जसप्रीत बुमराहला कसोटी मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. जसप्रीत बुमराहच्या जागी मुकेश कुमारला संघात स्थान दिले जात आहे. रांचीची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. त्यामुळे भारतीय संघ २ वेगवान गोलंदाजांसह उतरणार की १ वेगवान गोलंदाजासह उतरणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Cricket news in marathi)

केएल राहुल बाहेर..

संघातील प्रमुख फलंदाज केएल राहुल देखील पहिल्या कसोटीनंतर संघाबाहेर झाला होता. दुखापतीमुळे त्याला दुसरा आणि तिसरा कसोटी सामना खेळता आला नव्हता. तिसऱ्या कसोटीत त्याचा बदली खेळाडू म्हणून देवदत्त पडीक्कलला संघात स्थान देण्यात आले होते. दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत रजत पाटीदारला संधी दिली गेली. मात्र तो या संधीचा पुरेपूर फायदा घेऊ शकलेला नाही. त्यामुळे चौथ्या कसोटीत देवदत्त पडीक्कलला पदार्पण करण्याची संधी दिली जाऊ शकते.

team india squad
Ind vs Eng 4th Test: भारत - इंग्लंड कसोटी मालिकेतील चौथा सामना केव्हा अन् कुठे रंगणार? जाणून घ्या A to Z माहिती

चौथ्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), देवदत्त पडिक्कल, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com