Kl Rahul : टीम इंडियाला मोठा धक्का, तिसऱ्या टेस्टमधून भारताचा स्टार खेळाडू संघाबाहेर

Kl Rahul , IND vs ENG Rajkot Test : टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टेस्टविरुद्ध मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलला मोठा धक्का बसला आहे. दुखापतग्रस्त केएल राहुलला तिसऱ्या टेस्टमध्ये खेळता येणार नाही.
kl rahul
kl rahultwitter
Published On

Kl Rahul , IND vs ENG Rajkot Test :

टीम इंडियाला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या टेस्टआधीच मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार खेळाडू केएल राहुलला मोठा धक्का बसला आहे. दुखापतग्रस्त केएल राहुलला तिसऱ्या टेस्टमध्ये खेळता येणार नाही. दरम्यान, भारत आणि इग्लंड यांच्यामध्ये तिसरी टेस्ट राजकोटमध्ये १५ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे केएल राहुलच्या जागी देवदत्त पडिक्क्लला संघात स्थान मिळू शकतं. (Latest Marathi News)

टीम इंडिया आणि इंग्लंडदरम्यान ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेत दोन्ही संघांनी एक-एक सामना जिंकला आहे. तर या मालिकेच्या पहिल्या सामन्यात केएल राहुल हा दुखापतग्रस्त झाला होता. पहिल्या टेस्टदरम्यान राहुलच्या उजव्या मांडीला दुखापत झाली. यामुळे तो दुसऱ्या टेस्टमधून बाहेर गेला होता. आता केएल राहुल तिसरी टेस्ट देखील खेळणार नाही. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

kl rahul
PKL Season 10: तमिळ थलायवाजचा धुव्वा उडवत पुणेरी पलटणची प्रो कबड्डीच्या सेमीफायनलमध्ये धडक

दरम्यान, बीसीसीआयने इग्लंडविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी १७ खेळाडूंच्या खेळाडूंची घोषणा केली होती. यात विराट कोहलीचाही सामावेश नव्हता. विराटने वैयक्तिक कारणामुळे सामन्यातून ब्रेक घेतला आहे.

बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे की,'केएल राहुल आणि रवींद्र जडेजा दुखापतीनंतर पुन्हा कमबॅक करत आहे. मात्र, त्यांना त्यांचा फिटनेस सिद्ध करावा लागेल. त्यानंतरच खेळण्यास संधी मिळू शकते. त्यांना चौथ्या टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळू शकते.

kl rahul
Mumbai Open 2024: लात्वियाची दरजा सेमेनिस्तेजा ठरली मुंबई ओपन टेनिस स्पर्धेची विजेती

भारत- इंग्लंड उर्वरीत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, अक्षर पटेल, आकाश दीप. ध्रुव जुरेल (डब्ल्यूके), केएस भरत (डब्ल्यूके), आर अश्विन, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, देवदत्त पडिक्कल,

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com