PKL Season 10: तमिळ थलायवाजचा धुव्वा उडवत पुणेरी पलटणची प्रो कबड्डीच्या सेमीफायनलमध्ये धडक

Tamil Thalivas vs Puneri Paltan: दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत चतुरस्त्र दर्शन घडविणाऱ्या पुणेरी पलटण संघाने तमिळ थलायवाज संघाचा 56-29 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
puneri paltan
puneri paltansaam tv news

Tamil Thalivas vs Puneri Paltan, Pro Kabaddi:

दहाव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत चतुरस्त्र दर्शन घडविणाऱ्या पुणेरी पलटण संघाने तमिळ थलायवाज संघाचा 56-29 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला.

इंडोर स्टेडियम येथे झालेल्या या लढतीत अस्लम इनामदारच्या वेगवान चढायामुळे पुणेरी पलटण संघाने तिसऱ्याच मिनिटाला सहा गुणांची आघाडी घेतली. मोहंमद रेजा काबुद्रहांगी याने पंकज मोहितेची सुपर टॅकल करताना तमिळ संघाला पुनरागमन करून दिले.

याचवेळी मोहित गोयतची बहुमोल चढाई आणि अबीनेश नडराजन याने विशाल चाहलची केलेली पकड यामुळे तमिळ संघावर पहिला लोन चढवाताना पुणेरी पलटण संघाने नवव्या मिनिटाला 12-2 अशी आघाडी मिळवली. (Kabaddi news in marathi)

मोहितने दहाव्या मिनिटाला अफलातून चढाई करून पुणेरी पलटणची आगेकूच कायम राखली. अजिंक्य पवारने तमिळ संघाकडून जोरदार आक्रमण केले. मात्र त्याला पुणेरी पलटण संघाचा बचाव भेदता आला नाही. पुणेरी पलटण संघाने सलग दुसरा लोन चढवून मध्यंतराला 28-10 अशी निर्णायक आघाडी घेतली.

puneri paltan
IND vs ENG, Test Series: राजकोट कसोटीत केएस भरतची होणार सुट्टी! या खेळाडूला मिळणार संधी

उत्तरार्धात मोहित गोयतने अभिषेकची पकड केली. पाठोपाठ अबीनेश याने मोहंमद रेजा याला पेचात पकडताना 27व्या मिनिटाला तमिळ संघाचा केवळ एक खेळाडू मैदानात ठेवला. पाठोपाठ पुणेरी पलटण संघाने सलग तिसरा लोन चढवताना 41-14 अशी आघाडी घेत सामन्याचा निकाल स्पष्ट केला.

puneri paltan
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी ?दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

अखेरच्या काही मिनिटात तमिळ संघाने पिछाडी कमी करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र पुणेरी पलटण संघाने आपले वर्चस्व आणि पकड कायम राखताना एकतर्फी विजयासह उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com