Asian Kabaddi Championship highlights, Day 2: आशियाई कब्बडी चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेचा थरार रिपब्लिक ऑफ कोरियातील बुसान येथे सुरु आहे. या स्पर्धेत भारतीय कबड्डी संघातील खेळाडू चमकदार कामगिरी करताना दिसून येत आहेत. २९ जून रोजी भारतीय संघ साखळी फेरीतील आपला चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यात इराणला ३३-२८ ने लोळवत भारतीय संघाने विजयाचा चौकार मारला आहे. यापूर्वी भारतीय संघाने कोरिया, चायनीज तैपेई आणि जपान संघावर विजय मिळवला होता. (India vs Iran)
या सामन्यात अस्लम इनामदार आणि पवन शेरावतने मोलाची भूमिका पार पाडली. अर्जुन देशवाल आणि परवेश या सामन्यात संघर्ष करताना दिसून आले होते. मात्र अंतिम निकाल भारतीय संघाच्या बाजूने लागला आहे.
जपानवर मिळवला एकतर्फी विजय..
या सामन्यात सुरुवातीपासूनच भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या हाल्फमध्ये भारतीय संघाने ३१-६ ची आघाडी घेतली होती. सुरुवातीच्या ४ मिनिटातच भारतीय संघाने जपानवर लोन चढवला. तर ८ व्या मिनिटाला जपानचा संघ दुसऱ्यांदा ऑल आउट झाला. भारतीय संघाने जपानला कमबॅक करण्याची कुठलीच संधी दिली नाही.
हीच दमदार कामगिरी कायम ठेवत भारतीय संघाने दुसऱ्या हाल्फमध्येही जपानवर हल्लाबोल केला. भारतीय संघाकडून सचिन तंवरने उल्लेखनीय कामगिरी करत सुपर १० पूर्ण केले. याच कामगिरीच्या बळावर भारतीय संघाला ४५ धावांनी एकतर्फी विजय मिळवता आला. (Latest sports updates)
अस्लम इनामदारचे सुपर १०..
मुंबईजवळ असलेल्या वाशिंद गावचा सुपुत्र अस्लम इनामदार (Aslam Inamdar)भारतीय संघासाठी देखील जोरदार कामगिरी करताना दिसून येतोय. प्रो कबड्डीत पुणेरी पलटन संघासाठी खेळताना देखील तो मोलाची भूमिका पार पाडत होता. राष्ट्रीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत महाराष्ट्राकडून तो चांगलाच चमकला होता.
या कामगिरीची दखल घेत त्याला भारतीय संघात संधी दिली गेली आहे. या संधीचं सोनं करत तो आशियाई कब्बडी चॅम्पियनशिप २०२३ स्पर्धेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देताना दिसून येत आहे. जपानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने आपले सुपर १० पूर्ण केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.