Mumbai Open 2024: लात्वियाची दरजा सेमेनिस्तेजा ठरली मुंबई ओपन टेनिस स्पर्धेची विजेती

Mumbai Open Tennis Tournament: या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत लात्वियाच्या सहाव्या मानांकित दरजा सेमेनिस्तेजा हीने ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटरचा ५-७, ७-६(६), ६-२ असा पराभव केला.
Semenistaja
Semenistaja saam tv news

Mumbai Open Tennis Tournament Final:

महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आणि क्रिकेट क्लब ऑफ इंडिया (सीसीआय) आयोजित एल अॅण्ड टी मुंबई ओपन डब्लूटीए १लाख २५हजार डॉलर टेनिस स्पर्धेत एकेरीत लात्वियाच्या दरजा सेमेनिस्तेजा हीने विजेतेपद संपादन केले.

क्रिकेट क्लब ऑफ इंडिया येथील टेनिस कोर्टवर पार पडलेल्या या स्पर्धेत एकेरीत अंतिम फेरीत चुरशीच्या लढतीत लात्वियाच्या सहाव्या मानांकित दरजा सेमेनिस्तेजा हीने ऑस्ट्रेलियाच्या स्टॉर्म हंटरचा ५-७, ७-६(६), ६-२ असा पराभव केला.

हा सामना २तास ३०मिनिटे चालला. या सामन्यातील पहिल्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस राखल्या. सामन्यात बरोबरी असताना स्टॉर्मने परतिचे सुरेख फटके लावत १२व्या गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट ७-५ असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्ये दोन्ही खेळाडूंनी जिगरबाज खेळाचे प्रदर्शन आपापल्या सर्व्हिस राखल्या व त्यामुळे सेट टायब्रेकमध्ये गेला.

टायब्रेकमध्ये दरजाने वेगवान खेळ करत हा सेट ७-६(६) असा जिंकून सामन्यातील आपले आव्हान कायम राखले. तिसऱ्या व निर्णायक सेटमध्ये दरजाने आपला खेळ उंचावत स्टॉर्मची पाचव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट ६-२ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरले

Semenistaja
IND vs ENG, Test Series: राजकोट कसोटीत केएस भरतची होणार सुट्टी! या खेळाडूला मिळणार संधी

दरजा हीने याआधी मागील महिन्यात बेंगळुरू येथील ५००००डॉलर आयटीएफ स्पर्धेत जेतेपदाला गवसणी घातली होती. तिचे या वर्षातील हे दुसरे विजेतेपद आहे. स्पर्धेतील विजेत्या दरजा सेमेनिस्तेजा हिला ट्रॉफी, १५०००डॉलर्स व १२५ डब्लूटीए गुण, तर उपविजेत्या स्टॉर्म हंटरला ट्रॉफी, ८००२ डॉलर्स, ८१ डब्लूटीए गुण अशी पारितोषिके देण्यात आली.

एकेरी: अंतिम फेरी:

दरजा सेमेनिस्तेजा(लात्विया)(६)वि.वि.स्टॉर्म हंटर(ऑस्ट्रेलिया)५-७, ७-६(६), ६-२.

Semenistaja
IND vs ENG Test Series: भारत- इंग्लंड कसोटी मालिकेत कोण मारणार बाजी ?दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com