भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने विक्रमी ४३४ धावांनी विजय मिळवला आहे. यासह कसोटी मालिकेत २-१ ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील चौथा कसोटी सामना येत्या २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेइंग ११ मध्ये एक मोठा बदल पाहायला मिळू शकतो.
रजत पाटीदार होणार बाहेर...
देशांतर्गत क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारला (Rajat Patidar) भारतीय संघाकडून खेळण्याची संधी देण्यात आली होती. मात्र २ कसोटी सामन्यातील ४ डावात त्याला आपली छाप सोडता आलेली नाही. पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात तो ३२ धावांवर तर दुसऱ्या डावात ९ धावा करत माघारी परतला.
पहिल्या कसोटीत फ्लॉप ठरल्यानंतर असं म्हटलं जात होतं की, तो दुसऱ्या सामन्यात कमबॅक करेल. मात्र असं काहीच झालं नाही. राजकोट कसोटीतील पहिल्या डावात तो १० आणि दुसऱ्या डावात शून्यावर बाद होऊन माघार परतला. त्याची ही सुमार कामगिरी पाहता त्याला रांची कसोटीतून बाहेर बसावं लागेल. (Cricket news in marathi)
कोणाला मिळणार संधी?
रजत पाटीदारला मध्यक्रमात समतोल राखण्यासाठी संघात स्थान दिलं गेलं होतं. मात्र त्याला संधीचं सोनं करता आलेलं नाही. तर दुसरीकडे संघाबाहेर असलेला केएल राहुल कमबॅक करण्याच्या प्रयत्नात आहे. असं म्हटलं जात आहे की, केएल राहुल चौथ्या (KL Rahul Comeback) कसोटी सामन्यापूर्वी पूर्णपणे फिट होऊ शकतो.
त्यामुळे रांची कसोटीत त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. त्यामुळे रजत पाटीदारला बाकावर बसावं लागेल. रोहित, गिल, जयस्वालपासून ते सरफराजपर्यंत सर्वच फलंदाज तुफान फॉर्ममध्ये आहेत. त्यामुळे केएल राहुलचं कमबॅक झाल्यास रजत पाटीदारला बाहेर व्हावं लागेल.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.