Manasvi Choudhary
हिंदू धर्मात गुढी पाडवा या सणाला विशेष महत्व आहे. हिंदू नववर्षातील पहिला सण म्हणजे गुढी पाडवा आहे.
गुढी पाडवा हा सण हिंदू कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदा तिथीला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो.
गुढी पाडवा या सणाला घरोघरी गुढी उभारतात. मात्र वास्तू शास्त्रात गुढी उभारण्याचे काही नियम आहेत.
गुढीपाडव्याला गुढी कोणत्या दिशेला उभारावी हे यो वेबस्टोरीतून जाणून घेऊया. यंदा गुढीपाडवा हा सण 19 मार्च 2026 रोजी साजरा होईल.
गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या दाराजवळ पूर्व दिशेला गुढी उभारणे शुभ मानले जाते.
पूर्व दिशा ही शुभ, ऊर्जा आणि नवीन सुरूवात याचे प्रतीक मानली जाते, कारण सूर्य याच दिशेपासून उगवतो.
शक्य असल्यास तुम्ही ईशान्य दिशेला देखील गुढी उभारा. ईशान्य दिशा ही सकारात्मक उर्जेचे प्रतीक आहे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसोठी योग्य सल्ला घ्या.