WPL 2024: मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामन्याने होणार WPL ची सुरुवात;पाहा संपूर्ण वेळापत्रक

WPL 2024 Schedule: बीसीसीआयने मंगळवारी (२३ जानेवारी) वुमन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे.
WPL 2024
WPL 2024saam tv news
Published On

Women's Premier League Full Schedule:

बीसीसीआयने मंगळवारी (२३ जानेवारी) वुमन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या स्पर्धेला २३ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार असून १७ मार्च रोजी स्पर्धेतील अंतिम सामना खेळला जाणार आहे.

गतवर्षी या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन मुंबई आणि नवी मुंबईमध्ये करण्यात आले होते. मात्र यावेळी या स्पर्धेतील सामने बंगळुरु आणि दिल्लीत आयोजित केले जाणार आहेत.

या २ स्टेडियममध्ये खेळवले जाणार WPL चे सामने...

वुमन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेतील सर्व सामने दिल्लीतील अरुण जेटली आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर रंगणार आहेत. या स्पर्धेत एकूण २२ सामने खेळले जाणार आहेत. या २२ पैकी ११ सामने दिल्लीत तर ११ सामने बंगळुरुत खेळले जाणार आहेत.

या स्पर्धेची सुरुवात गतविजेती मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने होणार आहे. हे या स्पर्धेतील दुसरे हंगाम असणार आहे. स्पर्धेतील पहिल्या हंगामात हरमरप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी घातली होती. तर अंतिम सामन्यात मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. (Cricket news in marathi)

WPL 2024
David Warner: डेव्हिड वॉर्नरही रामाच्या भक्तीत तल्लीन! प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शेअर केली खास पोस्ट

असं असेल स्पर्धेचं स्वरुप...

या स्पर्धेतील सुरुवातीच्या ११ सामन्यांचे आयोजन बंगळुरुतील एम चिन्नास्वामीच्या मैदानावर केले जाणार आहे. त्यानंतर पुढील सामने दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळले जाणार आहेत. साखळी फेरीतील २०, एलिमिनेटर आणि फायनल धरुन एकूण २२ सामने खेळले जाणार आहेत.

WPL 2024
IND vs ENG 1st Test: इंग्लंडला हलक्यात घेऊ नका..' कसोटी मालिकेपूर्वीच दिग्गज खेळाडूची टीम इंडियाला वॉर्निंग

जो संघ साखळी फेरीतील सामन्यांमध्ये सर्वोच्च स्थानी असेल तो संघ थेट अंतिम फेरीत दाखल होणार आहे. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी असलेला संघ एलिमिनेटरचा सामना खेळून अंतिम फेरीत प्रवेश करेल.मुख्य बाब म्हणजे या स्पर्धेदरम्यान एका दिवशी एकच सामना खेळला जाईल. या स्पर्धेत एकही डबल हेडर सामना पाहायला मिळणार नाही.

पाहा संपूर्ण वेळापत्रक

असे आहेत ५ संघ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB)

गुजरात जाएंट्स (GG)

मुंबई इंडियन्स (MI)

दिल्ली कॅपिटल्स (DC)

यूपी वॉरियर्स (UPW)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com