IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ६७ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर सुरु आहे. प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा आहे.
या महत्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटक अखेर २२३ धावा केल्या आहेत. तर दिल्ली कॅपिटल्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी २२४ धावांची गरज आहे.
चेन्नईची जोरदार सुरुवात..
या महत्वाच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून ऋतुराज गायकवाड आणि डेव्होन कॉनव्हेने तुफानी सुरुवात केली होती. दोघांनी मिळून १४१ धावांची भागीदारी केली. ऋतुराज गायकवाड ५० चेंडूंमध्ये ७९ धावांची खेळी केली.
डेव्होन कॉनव्हे ५२ चेंडूंमध्ये ११ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने ८७ धावांची खेळी केली. शेवटी शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाने तुफानी खेळी केली. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी २२४ धावांची गरज आहे.
या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:
दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रिली रोसोव, यश धुल, अमन हकीम खान, अक्षर पटेल, ललित यादव, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, एनरिक नॉर्टजे
चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, अंबाती रायुडू, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (कर्णधार आणि यष्टीरक्षक), दीपक चाहर, तुषार देशपांडे, महेश थिक्षाना
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.