David Warner: डेव्हिड वॉर्नरही रामाच्या भक्तीत तल्लीन! प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर शेअर केली खास पोस्ट

Ayodhya Ram Temple: राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नरने एक खास पोस्ट शेअर केली आहे.
David warner
David warnersaam tv news
Published On

David Warner Post On Ram Mandir Pran Pratishtha:

अयोध्येत राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाला नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. यासह दिग्गज क्रिकेटपटू, नेतेमंडळी आणि बॉलीवूड स्टार्सला देखील आमंत्रण देण्यात आलं होतं. भारताकडून सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) अनिल कुंबळे (Anil Kumble) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. दरम्यान सातासमुद्रापार असलेल्या डेव्हिड वॉर्नरच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. (David Warner Instagram Post)

ऑस्ट्रेलियाचा आक्रमक फलंदाज डेव्हिड वॉर्नर (David Warner) हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्याचे पोस्ट तुफान व्हायरल होत असतात. नुकताच त्याने आपल्या पोस्ट शेअर केली आहे,ज्यात भगवान श्री राम यांचा फोटो असल्याचं दिसून येत आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने जय श्री राम इंडिया.. असं लिहिलं आहे. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून नेटकरी आपल्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत. (Sports News In Marathi)

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिग्गज खेळाडूंची हजेरी..

प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी दिग्गज खेळाडूंना आमंत्रण देण्यात आलं होतं. दरम्यान या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्यासाठी सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे आणि रविंद्र जडेजा या स्टार क्रिकेटपटूंनी अयोध्येत हजेरी लावली होती.

David warner
IND vs ENG: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! इंग्लंडविरुद्ध पहिल्या २ कसोटी सामन्यातून विराट कोहली बाहेर

या क्रिकेटपटूंचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान विराट कोहली आणि एमएस धोनी यांना देखील या सोहळ्यासाठी आमंत्रण मिळालं होतं. मात्र हे दोघेही दिसून आलेले नाहीत.

David warner
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाज इंग्लंडविरुद्धच्या संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर?

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com