Summer Beaches Tourism: मुलांसोबत मार्चमध्ये फिरायला जायचा प्लान करताय? मग मुंबईजवळचे हे स्वच्छ समुद्र किनारे नक्की पाहा

Sakshi Sunil Jadhav

मुलांसोबत पिकनिक प्लान

सध्या उन्हाळा सुरु झालाय आणि मुलांच्या शाळांना लवकर सुट्टी पडेल. यादिवसांमध्ये नेहमीच मुलांसोबत त्यांच्या पालकांनाही आरामासाठी सुंदर अन् शांत ठिकाणी फिरायला आवडतं.

Summer Beaches Tourism

मार्च एप्रिल पिकनिक प्लॅन

उन्हाळ्याच्या सुट्टीत मार्च ते एप्रिल महिन्यात मुलांसोबत पिकनिकसाठी तुम्ही पुढील प्रसिद्ध बीचवर जाऊन थमाल करु शकता. स्वच्छ पाणी, सोनेरी वाळू आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतं.

clean beaches near Mumbai

अलिबाग

मुंबईपासून जवळपास 95 किमी अंतरावर असलेला हा बीच कुटुंबासोबत पिकनिकसाठी फेमस आहे. फोटोसाठी सूर्योदय-सूर्यास्ताची वेळ उत्तम मानली जाते. जवळच स्थानिक सीफूड रेस्टॉरंट्स आणि कोकणी पदार्थ मिळतात.

Alibaug beach travel guide

काशीद बीच

मोत्यासारखं चमकणारं पाणी आणि सोनेरी वाळूमुळे हा बीच कोकणातला सर्वात सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. मार्च-एप्रिलमध्ये ईथे हवामानही उत्तम असतं. जवळच होमस्टे, रिसॉर्ट्स आणि बीचसाइड कॅफे उपलब्ध आहेत.

Kashid beach travel guide

हरिहरेश्वर बीच

शांत वातावरण आणि स्वच्छ किनाऱ्यामुळे हा बीच कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे. जवळच प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे धार्मिक पर्यटनही करता येते. राहण्यासाठी रिसॉर्ट्स आणि लॉज उपलब्ध आहेत.

Harihareshwar beach trip

प्रवासाची सोपी माहिती

मुंबईहून या समुद्रकिनाऱ्यांपर्यंत कार, एसटी बस किंवा फेरी बोटीद्वारे सहज पोहोचता येते. Gateway of India येथून फेरीने अलिबागला जाण्याचा अनुभवही पर्यटकांसाठी खास असतो.

Harihareshwar beach trip

राहण्याची सोय

अलिबाग, काशिद आणि हरिहरेश्वर येथे बजेट होमस्टेपासून ते लक्झरी रिसॉर्ट्सपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कुटुंबासोबत जाणाऱ्यांसाठी समुद्रकिनाऱ्याजवळील होमस्टे सुरक्षित पर्याय ठरतात.

Harihareshwar beach trip

फोटोसाठी खास ठिकाणं

सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी समुद्रकिनाऱ्यांवर अप्रतिम दृश्य दिसते. निळाशार समुद्र, सोनेरी वाळू आणि नारळाची झाडे फोटोसाठी उत्तम पार्श्वभूमी देतात. कुटुंबासोबत आठवणी जपण्यासाठी बीचवरील वॉक आणि शेल्ससह फोटो काढणं हा खास अनुभव ठरु शकतो.

summer vacation travel Maharashtra

खाण्यासाठी प्रसिद्ध पदार्थ

कोकणात ताजे सीफूड, सोलकढी, कोकणी थाळी आणि नारळावर आधारित पदार्थ खूप प्रसिद्ध आहेत. स्थानिक ढाबे आणि बीचसाइड रेस्टॉरंट्समध्ये प्रॉन्स, फिश फ्राय आणि कोकम सरबत नक्की ट्राय करा

summer vacation travel Maharashtra

NEXT: Jio Recharge: खुशखबर! कॉलिंग-डेटाचं टेन्शन संपलं! 1 रिचार्ज प्लानमध्ये 200 दिवसांची वैधता; पण किंम्मत किती?

Jio 200 days validity plan
येथे क्लिक करा